वाडा पोलीस ठाणे हद्दितील नेहरोली येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींच्या खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास पालघर पोलीसांना यश…

0
Spread the love

उपसंपादक – मंगेश उईके

वाडा :-पालघर जिल्हा ता. वाडा
मौजे नेहरोली ता. वाडा येथे मुकुंद बेचरदास राठोड वय ७५ वर्ष, त्यांची पत्नी कांचन मुकुंद राठोड, वय ७२ व मुलगी संगीता मुकुंद राठोड वय ५२ वर्ष हे गुजराती कुटुंब गेल्या २०-२५ वर्षापासुन राहतात. त्यांचा फोन दिनांक १७/०८/२०२४ रोजी पासुन बंद येत असल्याने मुकुंद राठोड यांच्या मुलांनी घरा शेजारी राहणारे उज्वला तुळशीराम ठाकरे यांना दिनांक २०/०८/२०२४ रोजी वडीलांच्या घरी जावुन चौकशी करा असे सांगीतले तेव्हा गुजराती कुटुंब राहत असलेले घराचे दरवाजे, तसेच त्यांचेकडे भाडयाने राहणारे भाडेकरु यांचेही दरवाजे बंद असुन घरांना बाहेरुन कुलुप लावलेले असल्याचे सांगीतले. पंकज मुकुंद राठोड रा. विरार व सुहास मुकुंद राठोड रा. राजकोट गुजरात ही मयताची मुले नेहरोली येथे दिनांक ३०/०८/२०२४ रोजी आले असता त्यांचे वडील राहत असलेल्या घराला बाहेरुन कुलुप लावलेले होते. त्यांनी आजुबाजुला शोध घेवुन नंतर बंद दरवाजाला लावलेले कुलुप तोडुन घरात प्रवेश केला असता त्यांचे घरामध्ये दुर्गंधी पसरलेली होती.

त्यांच्या घरातील बाथरुमच्या भिंतीजवळ वडीलांचे प्रेत चादरीने झाकुन ठेवलेले दिसले. त्या प्रेतावर किडे फिरत असलेले व प्रेताचे अंगावरील कातडी व चरबी वितळून त्याचा द्रव पदार्थ घरामध्ये वाहत असल्याने त्यांनी घाबरुन गावातील लोकांना बोलावुन आणले, नंतर पोलीसांना बोलावले त्यांचे सोबत पुन्हा घरात जावुन पाहिले असता त्यांची आई व बहिण यांची प्रेत घरामध्ये असलेल्या पेटीमध्ये लपवुन ठेवलेली व त्यावर चादर व कपडे टाकुन पेटीचे झाकन बंद करुन ठेवले होते. यावरुन त्यांचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केलेबाबत मयताचा मुलगा पंकज मुकुंद राठोड, वय ४८ वर्ष, व्यवसाय-लॉन्ड्री, रा. यशवंत नगर, ओलीव बिल्डींग, ए.वींग, ३०५, विरार वेस्ट, ता. वसई, जि. पालघर मुळ रा. नेहरोली, ता. वाडा, जि. पालघर यांनी वाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गु.रजि. नं.ा ३६९/२०२४ भा.न्या.सं.क. १०३(१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवून पो. निरी. दत्तात्रय किंद्रे, वाडा पोलीस ठाणे यांना वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासाबाबत सुचना दिल्या.

त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांचेसह सुरु केला.

सदर गुन्हयाचे घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करुन श्वॉन बेली हिला गुन्हयाचे घटनास्थळी मिळुन आलेल्या वस्तुंचा वास दिला असता ती मयत राहत असलेल्या घराच्या पहिल्या माळयावर बंद असलेल्या भाडयाच्या खोल्यांमध्ये गेली. सदरचे श्वान तेथे पुर्वी भाडयाने राहणारा आरिफ अन्वर अली रा. उत्तरप्रदेश याच्या खोलीमध्ये जात होते व पुन्हा घटनास्थळी येत होते. ते श्वान सदरची कृती पुन्हा पुन्हा करत होते. म्हणुन आरिफ अन्वर अली याच्यावर संशय वाढला. तो सध्या काम करत असणाऱ्या ठिकाणी तसेच त्याचे मित्र राहत असणाऱ्या ठिकाणांची माहिती मिळवुन त्याचा शोध घेतला असता मिळुन आला नाही. तसेच त्याच्या सोबतचे काही लोकही मिळुन आले नाहीत म्हणुन तातडीने तपास पथक उत्तरप्रदेशकडे रवाना केले. दरम्यान आरिफ अन्वर अली मुळ रा.गौरा मेंदुआ पोस्ट अमोरा, ता. मेजा रोड, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश त्याच्या मुळगावी जावुन शोध घेतला असता तो त्याच्या घरी देखील मिळून आला नाही.

उत्तरप्रदेश येथील STF व स्थानिक पोलीसांच्या मदतीने त्याचा शोध घेत असतांना नमुद इसम हा तेथील मेजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची बातमी तपास पथकाने कौशल्याने मिळवली व त्याला सापळा रचुन ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल विचारपुस केली असता त्याने गावी जाता जाता जास्त पैसे, दागीने मिळू शकतील म्हणुन पैशांसाठी त्या दिवशी दुपारी १ वाजताचे सुमारांस राठोड यांच्या घरात हातोडी परत करण्याचे बहाण्याने प्रवेश करुन एकटी संगीता घरात असतांना व कांचन हया झोपल्या असतांना दरवाजा बंद करुन प्रथम संगीतावर हातोड्याने डोक्यात २-३ प्रहार करुन लगेच तेथेच शेजारी बेडवर झोपलेल्या कांचन यांच्या डोक्यावर देखील हातोड्याने आघात केले. दोघी निपचीत पडल्यावर त्यांचे शव ओढत शेजारच्या रुममध्ये नेले.

दरम्यान मुकुंद राठोड यांच्या स्कुटरचा बाहेर आवाज आला तेव्हा आरिफ घराची आतील कडी खोलुन दरवाजा मागे लपुन बसला व मुकुंद राठोड याने घरात प्रवेश करताच दरवाजा लावुन त्यांच्या कपाळावर देखील जोराचे आघात करुन त्यांचा देखील खून केला. नंतर त्यांचे प्रेत दुसऱ्या खोलीत ओढत नेवुन त्यांचे प्रेतावर चादरी टाकुन प्रेत झाकुन ठेवले. त्यानंतर मयत कांचन व संगीता यांची प्रेत रुममध्ये असलेल्या पत्र्याच्या मोठ्या पेटीमध्ये टाकुन त्यांचे अंगावर चादरी, ब्लँकेट, कपडे टाकुन त्यांची प्रेत झाकुन ठेवली व पेटीचे झाकन बंद करुन घेतले. त्यानंतर घरामधील सर्व रक्त पुसुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हत्यार हातोडा लपवुन टाकला आणी अंगावरील कपडे काढून अंघोळ करुन मयताचा मोबाईल घेवुन तेथुन बाहेरुन घराला कुलूप लावुन स्वतःच्या बायको मुलांना घेवुन तातडीने गावाला जायचे आहे असा बहाणा करुन पळून गेला.
अशी हकीकत सांगुन कबुली दिल्याने त्याला नमुद गुन्हयात अटक केली असुन अधिक तपास सुरु आहे.

सदरची कामगीरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार यांचे मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, सपोनि अजित सावळे, सपोनि/अजित गोळे, पोउानि./सुमेध मेढे, मपोउपनि./सुप्रिया मांढरे, पोउपनि / मयुर शेवाळे, पोउपनि / मयुरेश अंबाजी, पोउपनि/विजय डाखोरे, पोउपनि./ सागर मालकर, सफौ/दयानंद पाटील, पोहवा/गुरुनाथ गोतारणे, पोहवा/विजय मढवी, पोहवा/मोहन पाटील, पोहवा/नामदेव गवळी, पोशि/संतोष वाघचौरे, पोशि/भुषन खिलारे, पोशि/गजानन जाधव, पोशि/चेतन सोनावणे, पोशि/सचिन भोये, पोशि/निलेश जनाटे, पोशि/हरेश काळे सर्व नेम. वाडा पोलीस ठाणे तसेच तांत्रीक सहाय्यक सपोनि अविनाश घरबुडे, सायबर पोलीस ठाणे, पालघर सपोनि/व्हटकर, सपोनि/सुळे, पोउपनि /रोहीत खोत, पोउपनि/सावंतदेसाई, पोउपनि/वानखेडे, पोहवा/संजय धांगडा, पोहवा/कैलास पाटील, पोहवा/विजय ठाकुर, पोहवा/दिनेश गायकवाड, पोहवा / संदीप सरदार, पोहवा/संतोष निकोले, पोहवा/दिलीप जनाठे, पोना/केंगार, पोअ/वैभव जामदार, पोअ/प्रशांत निकम, पोअ/नरेश घाटाळ सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी अथक प्रयत्न करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट