पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायान्वये सन 2024 मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ति, संत व समाज सुधारक यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहेत.. आणि त्याअनुषंगाने आज दिनांक 05 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते श्री. चक्रधर स्वामी (भाद्रपद शुक्ल द्वितीया तिथीनुसार) यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले… तद्नंतर त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन त्यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना थोडक्यात माहिती सांगण्यात आली..

सदरचे आयोजित जयंती कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह पोलीस निरीक्षक तथा पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) श्रीमती- नंदिनी चानपुरकर, पो.नि. दिनेश लबडे, चंद्रकांत काळे, म.पो.नि. वैशाली ढाले तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ मोठया संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com