साई सेवा प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जि.प.पु.प्रा.शाळा कशेळी नं.१ येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप…
प्रतिनिधी- सुशिल तांबे
राजापूर कशेळी :- साई सेवा प्रतिष्ठान (संस्थापक श्री सुशिल जानू तांबे)कशेळी दुर्गवाडी अंतर्गत प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिवसानिमित्त साई सेवा प्रतिष्ठान सलग्न जि. प.पु.प्राथमिक शाळा कशेळी नंबर १ बॅच २००५-२००६ तर्फे जि.प.पु. प्राथमिक शाळा कशेळी नंबर १ मधील बालवाडी ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांना उपयुक्त शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येणार आले.
त्याच बरोबर सद्याच्या युगात व्यायामाची काळाची गरज असल्या कारणे शालेय विद्यार्थी व दुर्गवाडीतील मुलांना व्यायाम शाळा प्रतिष्ठान मार्फत सुरू करण्यात आली अशा प्रकारे हा कार्यक्रम मोठ्या थाटमाट पार पडला.
या कार्यक्रमासाठी कु विकास डुकले,आदित्य सावरे,सूरज भोसले,विश्वास इंदुलकर,प्रसाद टुंबरे,नितेश राड्ये,महेश भोसले,तुषार वाडकर,यांचे योगदान मोलाचे होते.
त्याच बरोबर गावचे सरपंच सौ.हळदणकर मॅडम,दीपकजी हळदणकर,जायदे गुरुजी,नांदगावकर गुरुजी,अनंत फणसे,दिलीप फोडकर, वाडी प्रमुख गोकुळजी भोसले,भास्कर तांबे,जयवंत गुरव,प्रकशजी डुकले,कुणबी समाज सेवा मंडळ रजी सचिव संदिपजी राडये,विलासजी भोसले,सुधीर तांबे,मंदार डुकले,अंगणवाडी सेविका रुपाली मॅडम,आणि दुर्ग वाडीतील रहिवासी यांच्या उपस्थिती कार्यक्रम पार पडला.
प्रतिष्ठानचे संस्थापक श्री सुशिल जानू तांबे यांच्या या कार्याला सर्व मान्यवरांनी आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या आणि अंगणवाडी सेविका रुपाली मॅडम यांच्या हस्ते शिपल देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
