कत्तलीसाठी गोवंश जनावरांना निर्दयतेने कोंबून अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या १५ जनावरांची सुटका..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-🔹. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस निरीक्षक श्री. अजय भुसारी , ठाणेदार गोरेगाव यांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहीतीच्या आधारे दिनांक 09/09/2024 रोजी गोरेगाव येथील पोलीस पथकाने गोरेगाव हद्दीत गोरेगाव येथे गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी केली असता अशोक लेलँड बडा दोस्त MH 36 AA 3935 क्रमांकाचे वाहन म्हसगाव कडून गोरेगावच्या दिशेने येतांना दिसले.
.. सदर वाहन पोलीस पथकाचे मदतीने थांबविण्यात आले असता त्यातील दोन इसम हे पळून गेले. सदर वाहनाची तपासनी केली असता वाहना मध्ये 15 गोवंशय जनावरे हे दाटीवाटीने कोंबून भरून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे समजले. सदर वाहनांमधील 15 गोवंशय जनावरे प्रत्येकी दहा हजार असा एकूण एक लाख 50 हजार रुपये व अशोक लेलँड बडा दोस्त अंदाजे किंमत दहा लाख रुपये असा एकुण 11,50,000/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने अज्ञाताविरुध्द पो.स्टे. ला अप क्र.388 /2024 प्राण्यांचा छळवणूक प्रतिबंधक अधिनियम कलम 11(1)d,e,f,j सहकलम महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 5,6,9 सहकलम 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपास पो. उप. नी चव्हाण पो.स्टे. गोरेगाव हे करित आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उप-विभागिय पोलीस अधिकारी आमगाव श्री. प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनात पो.नि. अजय भुसारी (ठाणेदार गोरेगाव),पो.उप.नि.सुजित घोलप, पोउपनि आनंद चव्हाण, पोलीस अंमलदार पो.शी पवन कुमार वलथरे,शैलेंद्र बोंद्रे, तेजराम हरिणखेडे, रणधीर साखरे, यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com