डुग्गीपार पोलीसांनी हरवलेले ९ मोबाईलचा शोध घेवून मुळ मालक अर्जदारांना केले परत..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, उपविभागिय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी, श्री. विवेक पाटील, यांचे निर्देश सुचनेप्रमाणे पोलीस निरिक्षक, पो. ठाणे डुग्गीपार श्री. मंगेश काळे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे डुग्गीपार कार्यक्षेत्रातील इसमांच्या हरविलेल्या मोबाइल बाबत तक्रारी प्राप्त होताच तक्रारींची वेळीच दखल घेवून CEIR Portal प्रणालीद्वारे सायबर सेल, गोंदिया यांचे सहकार्याने नागरिकांचे हरविलेल्या एकूण 9 अँड्रॉइड मोबाईलचा अथक परिश्रम प्रयत्नांनी डुग्गीपार पोलीसांनी शोध घेवून परत मिळवण्यात यश आले आहे.



दिनांक- 04/09/2024 रोजी डुग्गीपार पोलीस ठाणे येथे तक्रारदार नागरिकांचे शोध घेण्यात आलेले एकूण 09 अँड्रॉइड मोबाईल फोन पोलीस निरिक्षक डुग्गीपार श्री. मंगेश काळे, यांचे हस्ते मुळ मालकांना- (अर्जदारांना) परत करण्यात आलेले आहेत.. डुग्गीपार पोलीसांनी अथक परिश्रम प्रयत्नांनी अर्जदारांचे हरविलेले मोबाईलचा शोध घेवून परत मिळवून दिल्याने अर्जदार लोकांनी मोबाईल परत मिळाल्याचे आनंदात डुग्गीपार पोलीसांचे मनापासून आभार मानून समाधान व्यक्त केले आहे..डुग्गीपार पोलीसांनी सुध्दा हद्दीतील कोण्या इसमांचे मोबाइल हरविल्यास त्याबाबत पोलीस ठाणे डुग्गीपार येथे तक्रार करण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे..

सदरची कार्यवाही मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री. विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. मंगेश काळे पो. ठाणे डुग्गीपार व पोहवा जगदीश मेश्राम, पोना महेंद्र सोनवाने, पोना रविंद्र रामटेके, पोशि उद्देभान रुखमोडे, चापोशि निखील मेश्राम यांनी सायबर सेल,गोंदिया येथील पो.हवा. संजय मारवाडे, रोशन येरणे, योगेश रहीले, यांचे मदत सहकार्याने कामगिरी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट