मोबाईल कंपनींचे टॉवर वरील महागडया रिमोट रेडीओ युनीटची चोरी करणारा सहकारनगर पोलीसांकडून जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-एकुण ५,७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

दि. ०८/०३/२०२४ रोजी फिर्यादी सागर राजेंद्र मोरे है नोकरीस असलेल्या अमेरीकन टॉवर कॉर्पोरेशन कंपनीने कैकेदार अपार्टमेंट, संभाजीनगर, धनकवडी पुणे व साई कृपा सीसायटी सहकारनगर पुणे येथे मोबाईल टॉवर बसवले होते. सदर टॉवरवर व्होडाफोन आयडीया कंपनीने ४ जी नेटवर्कसाठी रिमोट रेडीओ युनीट असे एकूण ९ नग मशीन बसविल्या होत्या. त्याची अज्ञात इसमाने चोरी केले त्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ७३/२०२४, भा.द.वि कलम ३७०९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हया मध्ये यापुर्वी १) अक्षय शांताराम बोडके वय २६ वर्षे रा.इंदिरानगर बिबवेवाडी पुणे २) अशिष अशीक शिंदे वय ३९ वर्षे रा. पापळ वस्ती बिबवेवाडी पुणे असे आरोपी अटक करण्यात आले होते. दि. २७/०८/२०२४ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व
पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस स्टेशनचे हददीत दहिहंडी सणनिमीत्त पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर यांना बातमी मिळाली की, मोबाईल टॉवरवरील किंमती मशीन चोरी करणारा एक इसम के. के. मार्केटचे पुढे भंगाराचे दुकानाजवळ चोरीच्या रिमोट रेडीओ मशीन पोत्यात घेवुन विक्री करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक छगन कापसे यांना कळविली.

त्यांनी लागलीच सपोनि, सागर पाटील व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुबना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस त्याचेकडील पौत्यातील मालासह ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) दिलशाद मोहमद रफिक वय ३२ वर्षे धंदा व्यवसाय सध्या रा. कुलउत्सव सोसायटी, डी बिल्डींग पाचवा मजला, फ्लॅट नं.५०२, खडी मशिन चौक कोंढवा पुणे मुळ रा.नुर गार्डन कॉलनी, वसीम का बेसमेंट जवळ, वाणा लिसाडीगेट जिल्हा मेरठ राज्य उत्तर प्रदेश असे सांगितले असुन त्याच्याकडे सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं ७९/२०२४ दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवून चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार अक्षय बोडके, अशिष शिंदे दोघे रा.बिबवेवाडी पुणे यांच्यासह केल्याचे कबुल केल्याने त्याचे ताब्यातून सदर गुन्हयातील व इतर गुन्हयातील असा एकुण ५,७०,०००/- रु किंचे मुद्देमालासह सदर गुन्हयात आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त सोो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील सो।, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, उत्तम भजनावळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार सागर सुतकर, खंडू शिदे, अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, सागर कुंभार, अमित पदमाळे, विशाल बाध यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट