रामनगर पोलीसांनी गुम झालेले दीड तोळा सोन्याचे दागिने व नगदी रकमेचा तात्काळ शोध घेऊन अवघ्या २४ तासात केले परत…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- याबाबात थोड्क्यात माहिती अशी की, दिनांक – २६/०८/२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता सुमारास इसम नामे- वसंतकुमार प्रभुजी राऊत वय – ४५ वर्ष रा. नवरगावकला, ता. जि. गोंदिया यांनी श्रीराम फायनान्स गांधी चौक, गोंदिया येथे त्यांनी गिरवी ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवून काही कामाने पाल चौक, रेलटोली, गोंदिया परिसरात गेले असता त्या दरम्यान त्यांचे १) दोन नग सोन्याची आंगठी वजन अंदाजे ८ ग्रॅम किंमती ५६,०००/- रू. २) एक नग सोन्याची नथ वजन अंदाजे दीड ग्रॅम किंमती १०,५००/- रू. ३) एक नग डोरला वजन अंदाजे ४ ग्रॅम किंमती २८,०००/- रू. ४) ४० नग सोन्याचे मणी वजन अंदाजे ३ ग्रॅम किंमती २१,०००/- रू. व नगदी रक्कम ६,७००/- रू. असा एकूण किंमती १,२२,२००/- रुपयेचा मुद्देमाल त्यांनी एका प्लास्टिक पिशवीत ठेवलेले हे पाल चौक, रेलटोली, गोंदिया परिसरात कुठेतरी गुम झाल्याने नमूद इसमाने पोलिस स्टेशन रामनगर गोंदिया येथे जाऊन याबाबत माहिती दिल्याने पोलिस निरीक्षक श्री. प्रवीण बोरकुटे यांचे मार्गदर्शनात डी. बी. पथकाला कारवाई कामी रवाना करून डी. बी. पथकाने अथक परिश्रम घेऊन परिसरातील सी. सी. टी. व्ही. फुटेज चेक करून व परिसरातील लोकांशी संपर्क करून संवाद साधून नमूद इसमाची हरवलेली प्लास्टिक पिशवीचा शोध घेऊन त्या मध्ये ठेऊन असलेले नमूद वर्णनाचे साडे सोळा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व नगदी रक्कम ६,७००/- रुपये असा एकूण किंमती १,२२,२००/- रुपयाचा मुद्देमाल त्या इसमास परत दिले. त्याबाबत इसम नामे वसंतकुमार प्रभूजी राऊत यांनी पोलिसांचे आभार मानले आहे.
सदरची कारवाई मा. पोलिस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे सा., मा. अपर पोलिस अधिक्षक श्री. नित्यानंद झा सा., श्रीमती. रोहिणी बाणकर मॅडम उप. वि. पो. अधिकारी, गोंदिया यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांचे आदेशान्वये पो.उप. नि. अमोल वाघमोडे, पो.हवा. सुनीलसिंह चौव्हान, पो. शि. कपिल नागपुरे, पो.हवा. राजेश भगत, पो.हवा. छत्रपाल फुलबांधे, पो.शि. उमेश भानारकर, चा.पो.शि. संदीप घरोटे, चा.पो.शि. श्याम फुंडे यांनी कारवाई केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com