आयपीएस तेजस्वी सातपुते यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई :-पोलीस दलातील परिमंडळ 5 च्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शेवगाव गावच्या सुकन्या असलेल्या तेजस्वी सातपुते यांचे शिक्षण बायोटेक्नॉलॉजी आणि लॉमध्ये पूर्ण झाले आहे. तेजस्वी सातपुते या 2012 बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत.
यापूर्वी त्यांनी पुणे येथे वाहतूक शाखेच्या प्रमुख (DCP) पदाची जबाबदारी मोठ्या कौशल्याने हाताळली होती. तसेच सातारा येथे दीड वर्षे कर्तव्य बजावताना करोना महामारीत पोलिसांसाठी अतिशय कमी वेळेत म्हणजेच 7 दिवसांत जंबो ऑक्सिजन कोविड सेंटर उभे केले होते.. तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीणमध्ये चांगले काम केले असून, त्यांनी राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तनमुळे सोलापूर पोलीस दलाचा सन्मान लोकसभेत झाला होता. मुंबई पोलीस दलात देखील तेजस्वी सातपुते यांनी आपली जवाबदारी पार पाडत मोठ्या पोलीस भरतीची प्रक्रिया योग्यपणे
राबविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com