शाळेकरी विद्यार्थी मुला – मुलींना “गुड टच व बँड टच”, छेडछाड आणि ” लैंगिक अत्याचार ” विषयावर सुयोग्य मार्गदर्शन…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-दामिनी पथकाचे उल्लेखनीय स्तुत्य उपक्रम..
❇️ पोलीस अधीक्षक गोंदिया मा.श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्ह्यात महिला, लहान मुले- मुली, बालके, शाळकरी विद्यार्थी, युवक- युवती, वृध्द,ज्येष्ठ नागरिक यांचे सुरक्षितता, महीला व बालके त्त्यांच्यावर होणारा अत्याचार रोखण्यासाठी दामिनी पथक व भरोसा सेल कार्य करीत आहे…. आणि यांकरिता दामिनी पथकाद्वारे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, अश्या ठिकाणी जन- जागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते आणि महीला, लहान बालके , मुले- मुली यांचे सुरक्षितता संबंधाने जनजागृतीद्वारें माहिती देण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया श्रीमती- रोहिणी बानकर मॅडम, यांचे देखरेखीखाली महीला पोलीस उप निरीक्षक श्रीमती राऊत यांचे नेतृत्वात दामीनी पथकाने पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील गुरुकृपा आदिवासी मुला- मुलींचे उच्च व प्राथमिक आणि माध्यमिक निवासी विद्यालय ठाणा येथे भेट दिली आणि सदर विद्यालयाचे प्राचार्य श्री. डोये सर व तेथील स्टाफ यांच्याशी भेट घेऊन शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारच्या छेडछाड बाबत तक्रार आहेत का ? याबाबत विचारपूस करुन समस्या जाणून घेतल्या.. तसेच शाळेतील शिक्षिका विना विद्यार्थिनीना एकट्यात विचारपूस केली मुलींना शाळेत किंवा शाळेबाहेर काही तक्रारी आहेत का याबाबत विचारपूस करून त्यांचे मत जाणून घेण्यात आले. तसेच उपस्थीत शाळेकरी मुला मुलींना “गुड टच व बँड टच” या विषयावर प्रोजेक्टरच्या माध्यमाद्वारे जनजागृतीपर व्हिडीओ क्लिप दाखवुन तसेच लहान मुला मुलींना प्रत्यक्षात प्रात्येक्षीक करुन दाखविण्यात आले. व लहान मुलांविषयी लैंगिक अत्याचार पासून बालकांचे संरक्षण अधिनियम,मुलांचे संबंधित कायदे याबाबत थोडक्यात माहिती अवगत करून दिली, तसेच तरुण युवक युवतींची फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून कशाप्रकारे फसवणूक होते याबाबत त्यांना माहिती व उपायोजना सांगण्यात आल्या..दैनंदिन घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना कश्या प्रकारे रोखता येऊ शकतात याबाबत सुयोग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आत्मसुरक्षा करुन स्वतःचे बचाव कसे करता येईल याबाबत सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले.. त्याचप्रमाणे शाळेकरी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
सदरचे स्तुत्य कार्य मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक राऊत पोलीस अंमलदार अंबादे, बावनकर, महिला पोलीस अंमलदार मंजुटे, भांदक्कर, चालक- मपोशि बरेजू दामीनी पथक आणि भरोसा सेल यांचेद्वारे करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com