सातारा जिल्हा पोलीस दलातर्फेपारधी समाजातील लोकांकरीता शासनाच्या विविध योजनाचा लाभघेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :- आज दिनांक २३/०८/२०२४ रोजी सातारा जिल्हा पोलीस दल यांचेतर्फे अलंकार हॉल करमणुक केंद्र सातारा येथे सातारा जिल्हयातील पारधी समाजातील नागरीकांकरीता मेळावा आयोजीत करण्यात आला होता. सदर मेळाव्याकरीता मा. श्री समीर शेख, पोलीस अधिक्षक सातारा, मा. श्री अतुल सबनीस, पोलीस उपअधिक्षक (गृह) सातारा, तसेच सातारा पोलीस दलातील अधिकारी व इतर अंमलदार त्याचप्रमाणे साहित्यीक नामदेव ज्ञानदेव भोसले असे हजर होते.




सातारा जिल्हयात बहुतांश पारधी समाज हा त्यांचे कुटूंबासह छोटया घरात / पालामध्ये वास्तव्यास आहे. त्यांच्या मुलांना योग्य शिक्षणाच्या व नोकरीच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरीता, तसेच वास्तव्याकरीता चांगल्या घराची सुविधा मिळणेसाठी तसेच त्यांना जन प्रवाहात आणण्याकरीता श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांच्या प्रयत्नातुन पारधी समाजाकरीता “पारधी उन्नती पर्व, परिवर्तनाची पाठशाला, समन्वय व मार्गर्शन” आयोजीत करण्यात आलेले होते. सदर मेळाव्या करीता पारधी समजातील सुमारे ४०० नागरीक हजर होते.
सदर मेळाव्यामध्ये श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अतुल सबनीस, पोलीस उप अधिक्षक (गृह) सातारा यांनी तसेच साहित्यीक नामदेव ज्ञानदेव भोसले त्याच प्रमाणे तहसीलदार कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, जिल्हा परीषद, स्टेट बँक ऑफ इंडीया यांनी पारधी समाजातील नागरीकांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा मिळणेसंदर्भात तसेच त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा याबाबत विशेष मार्गदर्शन करून सुचना दिल्या.
१) सदर मेळाव्याच्या समन्वयातून पारधी समाजातील उपस्थीत व इच्छुक व्यक्तींची कुटूंबनिहाय सविस्तर माहिती घेण्यात आली. त्यामुळे त्यांना शासनाच्या कोण-कोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे. हे महत्वाचे कामकाज मा.पोलीस अधीक्षक श्री. समिर शेख यांच्या प्रयत्नातुन करण्यात आलेले आहे.
२) समाज कल्याण कार्यालय सातारा यांचेतर्फे पारधी समाजाकरीता घरकूल योजना, वस्तीगृह योजना, सैनिक शाळा, निवासी शाळा, इतर उपलब्ध सोयी सुविधा यांची माहीती देण्यात आली.
३) इतर मागास बाहुजन कल्याण यांचे कार्यालयाकडून घरकुल, शिष्यवृत्ती. व तांडावस्ती सुधार याबाबत माहीती देण्यात आली.
४) जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा सातारा DRDA – ZP यांचेतर्फे घरकुल अनुदानाविषयी मागदर्शन केले.
(५) तहसिलदार कार्यालय सातारा यांचे तर्फे विविध प्रकारचे दाखले काढण्यासंदर्भात लागणारी कागदपत्र, व त्याबाबत आवश्यक असणारी माहिती देण्यात आली.
६) जिल्हाधीकारी कार्यालय सातारा यांचेतर्फे नवीन आधार कार्ड काढणेसाठी तसेच मोबाईल लिंक करणे व इतर अपडेशन करण्याकरीता सुविधा उपलब्ध करून दिलेली होती त्याचा इच्छुकांनी लाभ घेतला आहे.
७) एस.बी. आय. बँके यांचे प्रतिनिधींनी खाते उघडून देण्यासंदर्भात तसेच जनधन योजना, ग्राहक सेवा कार्यालय, प्रधानमंत्री सुरक्ष विमा योजना, प्रधानमंत्री जिवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना इत्यादी विवीध योजनांबाबत माहिती दिली.
वरील सर्व उपक्रमांबाबत माहीती दिल्यामुळे पारधी समाजातील हजर मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. तसेच कार्यक्रमास उपस्थीत असणाऱ्या पारधी समजातील नागरीकांपैकी उत्कृष्ट कामगीरी केलेल्या परिस्थीतीवर मात करून चांगले शिक्षण घेवून उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या व्यक्तींचा मा. श्री समीर शेख, पोलीस अधिक्षक सातारा यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास, श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अतुल सबनीस, पोलीस उप अधीक्षक, (गृह) सातारा, API सुधीर पाटील, रोहित फार्णे स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि वाळवेकर पोलीस कल्याण विभाग, API मुकुंद पालवे नियंत्रण कक्ष सातारा, API शाम काळे सातारा शहर पोस्टे, API अभिजित यादव वाहतुक शाखा सातारा, तसेच पोलीस कर्मचारी वृंद तसेच विविध गावांतील पोलीस पाटील असे उपस्थीत होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com