चोरीस गेलेल्या कुलरच्या मोटारीसह आरोपी चोरटे गोंदिया शहर पोलीसांच्या ताब्यात…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- याबाबात थोड्क्यात हकीगत अशी की, फिर्यादी श्री. सुनिल विरुमल चावला, वय-50 वर्ष, रा. सिंधी कॉलोनी गोंदिया, यांचे गौतमनगर गोंदिया येथे असलेल्या गोडाऊन मधुन दिनांक 12/12/2023 चे रात्री 22.00 वा ते 13/12/2023 चे रात्र दरम्यान अज्ञात चोरट्यानी कुलरचे 18 इंचीचे 24 नग मोटार किमती 36000/ – रु व 01 इंचीचे 16 नग मोटार किमती 16,000/ – रु असा एकुण 40 नग कुलरच्या मोटारी एकुण किमती 52,000/- रु चा मुद्देमाल चोरुन नेल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून पो. स्टे. गोंदिया शहर येथे अप. क्र. 773/2023 कलम 461, 380 भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते.

मा. वरिष्ठांचे निर्देशान्वये पो.नि. श्री किशोर पर्वते, पोलीस स्टेशन गोंदिया शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनिय सुत्राच्या आधारे आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे- 1) विशाल ऊर्फ विश्शु संजय चुटे, वय 20 वर्षे,

2) हेमंत ऊर्फ पिंटु रणधीर राठोड, वय- 19 वर्षे दोन्ही रा.स्कुलटोली, पिंडकेपार ता.जि. गोंदिया *
यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस कसुन तपास करुन चोरीस गेलेले मुद्देमालापैकी – 1) कुलरचे 18 इंचीचे 10 नग मोटार किमती 15,000/ – रु व 2) 01 इंचीचे 15 नग मोटार किमती 15,000/-रु असा एकुण किंमत- 30,000/ – रु. चा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त केले आहे….सदर गुन्हयाचा तपास पोहवा- सतिश शेंडे पो. स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत…..दोन्ही आरोपी दिनांक- 26/08/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर, मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री. किशोर पर्वते, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोहवा- कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, दिपक रहांगडाले, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, निशिकांत लोंदासे, मपोहवा रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट