मंकीपाॅकस ( Monkeypox) या विषाणूचा संसर्ग कसा होतो याबाबत स्पेशल रीपोर्ट..

0
Spread the love

प्रतिनिधी- विजय परमार

मुंबई :- सद्या जगामध्ये विविध देशांत मंकीपॉक्स (Monkeypox) या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्वीडन व पाकिस्तान या दोन देशात मंकीपॉक्स बाधित रुग्ण आढळलेले आहे. मंकीपॉक्स हा आजार Orthopox या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारचे खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. या आजाराचा कालावधी ६ ते १३ दिवस तथापि, ५ ते २१ दिवसा पर्यंत असू शकतो.

मंकीपॉक्स या आजाराचा प्रसार कसा होतो.

थेट शारीरिक संपर्क, शरीरद्रव, लैगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्वाव.

अप्रत्यक्ष संपर्क बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपडयामार्फत.

जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे.

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे: सर्वसाधारणेपणे मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २ ते ४ आठवडयात बरा होतो.

ताप

लसीका ग्रंथी सूज (कानामागी काखेतील जागेतील लसिका ग्रंथींना सूज येणे)

डोकदुखी, अंगदुखी

थंडी वाजणे, घाम येणे

घसा खवखवणे आणि खोकला.

मंकीपॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी :-

मंकोपॉक्स टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

संशयित मंकीपॉक्स रूग्णास वेळीच विलगीकरण करणे.

रूग्णांच्या कपडयांची अथवा अंथरूण पांघरूणाची संपर्क येऊ न देणे.

हातांची स्वच्छता ठेवणे.

आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे.

कोणतीही सदृश्य लक्षणे आढळल्यास नजिकच्या रूग्णालयास किवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास संपर्क साधावा.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट