छोटा गोंदिया, येथे रात्र दरम्यान घडलेल्या खुन प्रकरणाचा अवघ्या काही तासात उलगडा…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-खून करणाऱ्या आरोपीसह 2 विधि संघर्ष बालके जेरबंद…
स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदिया शहर पोलीस पथकाची कामगिरी…
▶️ याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक 22-08-2024 रोजी रात्री 23.00 वाजता ते 24.00 वाजताचे दरम्यान मृतक नामे- विकास उर्फ विक्की श्रीराम फरकुंडे वय 29 वर्षे, रा. चिचबन मोहल्ला छोटा गोंदिया, यास अज्ञात अरोपीतांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार हत्याराने मृतकच्या गळ्यावर, पोटावर, व शरीरावर इतरत्र वार करून गंभीर जखमा करुन जिवानिशी ठार केले असे मृतकचे वडील फिर्यादी- श्रीराम बुधराम फरकुंडे वय 60 वर्षे राह – छोटा गोंदिया यांचे तक्रारीवरून पो. ठाणे गोंदिया शहर येथे अप. क्र.521/2024 कलम 103 (1), भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये दिनांक 23-08-2024 रोजी 03.08 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर खून प्रकरण गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी खून प्रकरणातील गुन्हेगारांचा कशोशिने शोध घेवून गुन्हेगारांना तत्काळ जेरबंद करून खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश पो. नि. गोंदिया शहर आणि पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, यांना दिले होते..
मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर चे पो.नि. श्री.किशोर पर्वते, यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पोलीस पथक अशी विविध पथके सदर खून प्रकरणाचा उलगडा करण्याकरीता नेमण्यात आलेली होती…. गोपनीय माहितगार नेमण्यात आले होते…. सदर खून प्रकरणातील अज्ञात आरोपीतांचा शोध करीत असताना घटनास्थळावरून प्राप्त माहीती, परिसरातील नागरिकांची विचारपूस व गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे.. खून करणारा गुन्हेगार आरोपी नामे – 1) लक्की सुनील मेश्राम वय 18 वर्ष रा. संजय नगर, गोंदिया यांस गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले आहे ..
नमूद आरोपी यास गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन विचारपूस चौकशी केली असता तपासात यातील आरोपी यांनी त्याचे ईतर दोन साथीदार विधी संघर्ष बालके यांचेसह मिळून मृतक यास जुन्या भांडणाच्या कारणावरून, वैमनस्यावरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने गळ्यावर, छातीवर, पोटावर व शरिरावर ईतरत्र वार करून गंभीर जखमी करून जिवे ठार केल्याचे सांगितले…यावरून दोघा विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले… त्यांना सुध्दा विचारपूस चौकशी केली असता.. जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार हत्याराने वार करुन मृतक यास ठार केल्याचे सांगितले….. गुन्ह्याचे पुढील तपास कायदेशीर कारवाई करीता जेरबंद केलेले आरोपी व विधी संघर्ष बालके यांना गोंदिया शहर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे ….. पुढील तपास कायदेशीर कारवाई प्रक्रिया गोंदिया शहर पोलीस करीत आहेत.
मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री. किशोर पर्वते, पो. ठाणे गोंदिया शहर, यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पोलीस पथकाने तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वातील पथक-पो.हवा. राजू मिश्रा, महेश मेहर, सोमेंद्र तुरकर, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, छगन विठ्ठले, अजय रहांगडाले, चापोशि मुरली पांडे, घनश्याम कुंभलवार, खंदारे यांनी कामगिरी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com