गोंदिया जिल्हा “पोलीस दादालोरा खिडकी योजना” “एक हाथ मदतीचा योजनेअंतर्गत” स्तुत्य उपक्रम..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-गोंदिया जिल्हा पोलीस दल व एस. आय. एस. (इंडिया) लिमी. यांचे संयुक्त विद्यमाने

सुरक्षा गार्ड भरती / रोजगार मेळावा सन- 2024 चे उत्कृष्ठ आयोजन संपन्न

दुर्गम- अतिदुर्गम भागातील 238 बेरोजगार युवकांना मिळणार रोजगार

➖ पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांचे संकल्पनेतून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील नक्षल प्रभावित दुर्गम अतिदुर्गम भागांतील युवक – युवती यांच्या विकासासाठी, आणि भवितव्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

या अनुषंगाने गोंदिया जिल्हा पोलीस दल व भारतीय सुरक्षा दक्षता परिषद, नई दिल्ली यांच्यामार्फत एस.आय. एस. इंडिया लिमिटेड यांचे संयुक्त विद्यमाने सुरक्षा कार्याकरिता दिनांक 16/08/2024 ते 22/08/2024 रोजी पर्यंत गोंदिया जिल्ह्यातील विविध सहा पोलीस स्टेशन ज्यात आमगाव , देवरी, चिचगड, नवेगावबांध, केशोरी. तिरोडा, ईत्यादी ठिकाणी “सुरक्षा गार्ड रोजगार मेळाव्याचे” उत्कृष्ठ असे आयोजन करण्यात आले होते…. ..सदर आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात दुर्गम, अतिदुर्गम क्षेत्रातील साधारण 1000 च्या वर सुशिक्षित बेरोजगार तरुण युवकांनी यात आपला सहभाग नोंदवला….असून त्यामधून 238 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना एस. आय. एस. इंडिया लिमिटेड यांचे कमांडेट, क्षेत्रिय प्रशिक्षण अकादमी नागपूर, (महाराष्ट्र) येथे एक महिन्याच्या प्रशिक्षणा करिता नियुक्त करण्यात आले आहे……. प्रशिक्षण कालावधी संपताच एस. आय. एस. च्या संलग्नित असलेल्या विविध शासकीय, अर्थशासकीय, खाजगी कंपनी, खाणी, शैक्षणिक केंद्र, हॉटेल, हॉस्पिटल्स, मॉल, टोल ब्रिज, तसेच एअरपोर्ट इत्यादी ठिकाणी त्यांना स्थायी नेमणूक केली जाणार आहे…

पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली सूचना प्रमाणे सदर रोजगारनिर्मिती मेळाव्याचे उत्कृष्ठ आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव, देवरी, तिरोडा यांचे मार्गदर्शनात पो. ठाणे आमगाव , देवरी, चिचगड, नवेगावबांध, केशोरी. तिरोडा, ईत्यादी पो. ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस अधिकारी, अंमलदार, यांनी तसेच नक्षल सेल येथील अधिकारी अंमलदार यांनी अथक परिश्रम प्रयत्नांनी केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट