उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण यांच्या उपस्थितीमध्ये माणगांव तालुक्यातील स्कूल बस प्रथम सुरक्षा समिती सभा संपन्न …

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड :-रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात दि. २४ ऑगस्ट रोजी सुधाकर नारायण शिपूरकर स्कूलमध्ये पेण उप प्रादेशिक परिवहन यांची प्रथम सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माणगांव तालुक्यातील सर्व शालेय स्कूल बसेसचे चालक मालक शालेय कमिटी मेंबर मुख्याध्यापक शालेय बस व्यवस्थापक या सभेला उपस्थित होते.सभेच्या प्रारभी शिपूरकर स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा मोरे मॅडम, गगुबाई संभाजी शिंदे सी बी सी स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.मयेकर मॅडम, एस एस निकम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. कोकाटे मॅडम यांनी आर. टी. ओ. पेण उप प्रादेशिक मा. श्री. रवींद्र गावंडे साहेब, माणगांव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे साहेब, माणगांव वाहतूक शाखेचे उप पोलीस निरीक्षक संजय पवार साहेब, वाहतूक पोलीस, शिंदे साहेब व पोलीस हवालदार रामनाथ डोईपोडे, माणगांव स्कूल बस अध्यक्ष तसेच पेण उप प्रादेशिक आर टी. ओ. प्रतिनिधी सचिन पवार व उपस्थित सर्व मान्यवराचे फुलगुच्छ देऊन स्वागत केले.


शासन परिपत्रक एम व्ही आर ८०८/प्र. क्र. १५३/परी दि. ३० एप्रिल २०११ च्या परिपत्रक नियम क्र. ५ (२) मधील तरतूदिनुसार शालेय मुलाची ने आण सुरक्षितपणे करणे याकरिता आपल्या शाळेमध्ये परिवहन समिती गठीत केली आहे. सण २०२४-२५ करिता प्रथम सभेचे आयोजन माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळाचे सुधाकर नारायण शिपूरकर इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये आयोजीत केली होती यावेळी पेण उप प्रादेशिक परिवहन चे मा. श्री. रवींद्र गावंडे साहेब यांनी बस चालक मालक तसेच संस्थेतर्फे स्कूल बसने मुलाची ने आण करण्याकरिता सुरक्षितता असावी असे सांगितलं प्रत्येक मुलाचे स्टॉप त्याचा पत्ता मोबाईल नं. त्याचा रक्त गट अशी अद्ययावत असणे गरजेचं आहे असे स्पष्ट केले त्याच प्रमाणे बसमध्ये अग्निशमन सिलेंडर, आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी येणारे प्रथमोपचार साहित्य असणे आवश्यक आहे. व सदर परिपत्रकातील २८ मुद्याचे तंतोतंत पालन करून बसमध्ये सुधारणा करण्यात याव्या अशा सूचना श्री. रवींद्र गावंडे साहेब यांनी दिल्या. माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे साहेब व माणगांव वाहतूक शाखेचे उप पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी सुद्धा सर्व स्कूल बस चालक मालक तसेच शाळेय मुख्याध्यापिका शालेय व्यवस्थापक,शिक्षक पालक प्रतिनिधी, स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी,यांना मौलाचे मार्गदर्शन दिले बसची आवश्यक कागदपत्रे वैद्य असणे आवश्यक आहेत, स्कूल बस चालक यांच्याजवळ त्याचा लायसन्स बॅच असणे गरजेचे आहे तसेच बसमध्ये महिला मदतनिस निश्चित असणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले आहे.बसचा चालक हा अग्रेसीव्ह नसावा तो प्रामाणिक असावा बसमध्ये आसन क्षमता जास्त असेलेल्या बसमध्ये अटेंडत असणे आवश्यक आहे. शाळेतील शारीरिक शिक्षण विषयांचे शिक्षकामार्फत दिलेल्या रस्ता सुरक्षा पाठशाला सूचनापत्र सर्व विदयार्थ्यांना वाचून व समजावून सांगावे व ते सूचनापत्रक सर्व विद्यार्थ्यांना देण्यात याव्या.
सदर समितीत नियुक्त शिक्षक पालक संघातील सद्यास्थ्यांची सुद्धा सदर नियमाबाबत पालकांची जागृती करणे व अडचणीवेळी शाळा व पालक याच्याशी संवाद साधून नियमाची पालन होईल याकडे लक्ष देण्यात यावे असे सूचित करण्यात आले व दर सहा महिन्यात सदर समितीचे सभा घेऊन आढावा घेण्यात यावा असं सांगण्यात आले. यावेळी या समिती बैठकमध्ये शिपूरकर स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा मोरे मॅडम, गगुबाई संभाजी शिंदे cbsc स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. निशिगंधा मयेकर मॅडम, निकम स्कूलच्या सौ. कोकाटे मॅडम,माणगांव स्कूल बसचे युनियन अध्यक्ष, कार्याध्यक्ष श्री.सचिन पवार, शबीर अखवारे उपाध्यक्ष रंजीत बुटे,सेक्रेटरी मुबाशीर जिलानी व माणगांव तालुक्यातील सर्व शालेय व्यवस्थापक चालक मालक व पालकवर्ग व अन्य मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमांची सांगता एस एस निकम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. कोकाटे मॅडम यांनी आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com