शेतीमध्ये वयोवृध्द महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद करुन दोन गुन्हे उघडकीस आणले व एकूण २,५१,५००/- किंचा मुद्देमाल केला हस्तगत स्थानिक गुन्हे शाखापुणे ग्रामीणची कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-

नारायणगाव पो.स्टे गु.र.नं. २५६/२०२४ भा.न्या.सं. २०२३ कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे दि.१२/०८/२०२४ रोजीप्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी नामे भामाबाई बाबाजी येवले वय ६१ वर्षे रा. पारगावतर्फे आळे ता. जुन्नर जि.पुणे या मौजे कावळ पिंपरी गावचे हद्दीत शेतीमध्ये दिवसा शेतीकाम करत जनावरे चारत असताना मोटार सायकलवर आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देवून फिर्यादीचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने असा एकूण १,८९,०००/- मुद्देमाल जबरी चोरी करुन नेलेबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरदिवसा रोडलगत जनावरे चारत असणाऱ्या वयोध्द महिलेस लुटण्याचा प्रकार घडल्याने गुन्हयाचे गांभीर्य वाढले होते. त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करणेत आला. घटनास्थळाची पाहणी करून आरोपींची मोटार सायकल ज्या दिशेने गेली आहे त्या रोडवरील सौसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेज मध्ये उपयुक्त माहिती प्राप्त झाल्याने सुमारे १२० किमी पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज सलग तीन दिवस तपासणेत आले. संशईत मोटार सायकल शिक्रापूर परिसरात पोहाचली असल्याने परीसरातील बातमीदारांकडून तपास पथकाने बातमी मिळवून गुन्हा करणारे आरोपी नामे १) सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे वय-२४ वर्षे रा. बजरंगवाडी, शिक्रापुर ता. शिरुर जि. पुणे २) प्रथमेश उर्फ समर्थ संतोष सासवडे वय-१९ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापुर, ता. शिरुर जि.पुणे ३) अनिकेत रमेश सरोदे, वय २० वर्षे, ता. शिरुर जि. पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास करणेत आला, सदर गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने इसम नामे ४) अमोल एकनाथ पेटारे, वय- २९ वर्षे रा.बजरंगवाडी ता. शिरुर जि.पुणे याला दिल्याचे सांगितले.

आरोपीकडुन गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करणेत आलेली असून गुन्हयातील चोरी गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे, तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता जुलै महिन्यामध्ये शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे उरळगाव येथे याच प्रकारचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे. सदर बाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६५७/२०२४ भा. न्या.सं. कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा वरील आरोपींनी इसमनामे अभिषेक सुभाष पिटेकर रा. बुरुंजवाडी शिक्रापूर ता.शिरुर जि.पुणे यांला घेवून केला होता आरोपी अभिषेक सुभाष पिटेकर रा. बुरुंजवाडी शिक्रापुर ता. शिरुर जि.पुणे यालाही अटक करण्यात येवुन गुन्हयातील मंगळसुत्र व कर्णफुले हस्तगत करण्यात आले
आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, जुन्नर विभाग, जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार पोहवा तुषार पंदारे, दिपक साबळे, जर्नाधन शेळके, संजु जाधव, संदीप वारे, अक्षय नवले, अतुल डेरे, राजू मोमीण, सागर धुमाळ, निलेश सुपेकर नारायणगाव पो.स्टे कडील सपोनि शेलार, पोसई पाटील, पोलीस अंमलदार कोकणे, डोके यांनी केली आहे. यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट