तडीपार आरोपी नितीन थोरात यास धारदार शस्त्रासह अटक करण्यास नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस मोठे यश..

प्रतिनिधी – विजय परमार
नायगांव :-नायगाव पोलीस ठाणे हद्दीतून सराईत आरोपीत नामे नितीन सिताराम थोरात, राहणार-सव्हें नं ३६, चिचोंटी, ता. वसई जि. पालघर यास मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०२ वसई यांनी दिनांक ०८/०५/२०२४ रोजी ०२ वर्षांकरिता मुंबई शहर, उपनगर, ठाणे व पालघर या जिल्हयातुन तडीपार करण्यात आले होते.
दिनांक २०/०८/२०२४ रोजी गोपनीय माहितगारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील बापाने ब्रीजपासुन थोडे अंतर पुढे जंगलात जाणाऱ्या रोडवर तडीपार इसम नितीन सिताराम थोरात आपल्या नावाची दहशत निर्माण करुन गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्र घेवुन फिरत आहे अशी बातमी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि केकान यांना मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी लागलीच वपोनि रमेश भामे सर यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करुन कायदेशीर कारवाई करणेचाबत आदेशीत केले. त्यानुसार तडीपार इसम नामे नितीन सिताराम थोरात यांचा शोध घेतला असता तो बापाने ब्रीजलगत असणा-या जंगलातच्या पायवाटेवरती तलवारीसह बसलेल्या अवस्थेत मिळून आला असून सदर तडीपार इसम व त्यांच्या ताब्यात मिळून आलेली तलवार हीस पुढील तपासकामी ताब्यात घेवून सदर आरोपीत यांच्याविरुध्द पोशि/चेतन ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. 1 ४११/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीत यास गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास है पोहवा/काळू मुंढे करीत आहेत.
वरील कामगीरी श्री. मधुकर पांण्डेय, पोलीस आयुक्त, श्री. दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, श्रीमती पौणिमा चौगुले पोलीस उप आयुक्त, परीमंडळ २ वसई, श्री नवनाथ घोगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सागर टिळेकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि /रोशन देवरे, सपोनि/गणेश केकान, पो.अंम. सचिन मोहीते, सचिन खंताल, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, अङ्गारुद्दीन मस्ते यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com