आळेफाटा पोलीस स्टेशनने नागरीकांचे गहाळ झालेले ५२ मोबाईल राज्य परराज्यातुन काढले शोधुन…!

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :-आळेफाटा पोलीस स्टेशन हदिदमध्ये सन २०२३ – २०२४ दरम्यान गहाळ झालेले व तक्रार दाखल असलेल्या मोबाईल पैकी वेगवेगळया कंपनीचे एकुण ५२ मोबाईल फोन चालु बाजारभावा प्रमाणे १३,००,०००/- रू किंमतीचे वेगवेगळया ठिकाणावरून राज्य परराज्यातुन आळेफाटा पोलीसांनी शोधुन काढले आहेत. सदर मोबाईल फोन चे नागरीकांचे गहाळ झालेले व चोरीस गेलेले मोबाईल फोन वाटप करण्यात येणार असुन ज्यांचे ज्यांचे मोबाईल फोन आहे त्यांनी मोबाईलचे बिल दाखवुन लवकरात लवकर घेवुन जायचे आहे. असे आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांनी सांगीतले.



सदरची कामगीरी ही मा पंकज देशमुख साो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. रविंद्र चौधर साो उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग जुन्नर, यांचे मार्गदर्शना खाली प्रभारी अधिकारी पो.नि. सतिश होडगर, स.पो.नि. सुनिल बडगुजर, पो.स.ई पवार, सायबर पोलीस स्टेशन पो.नि. उमेश तावसकर, पो. ना. सुनिल कोळी, पो.कॉ. माळुंजे, पो.कॉ.
सचिन कोबल, पो.कॉ. लोहोटे, पोलीस मित्र अमित घोगरे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com