उंच भरारी योजना मार्फत सातारा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना विशेष मार्गदर्शन..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :-दिनांक २१/०८/२०२४
सातारा जिल्हयातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार अशा तरतुदी करणेसाठी उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे.

त्यामध्ये सातारा जिल्हयातील १८ ते ३५ या वयोगटातील युवक, युवती व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांना स्वतःव्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दिनांक २०/०८/२०२४ रोजी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, भोर व कोल्हापुर यांचे माध्यमातुन ४५ दिवसांचे प्रशिक्षणाकरीता सातारा जिल्ह्यातुन १. दुचाकी मॅकेनिक, २. असिस्टंट इलेक्ट्रीशियन या कोर्सचे तसेच सेवा सामाजिक विकास संस्था सातारा यांचे माध्यमातुन ६० दिवसाचे हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता एकुण १० युवकांना मा. पोलीस अधीक्षक, समीर शेख यांनी मार्गदर्शन केले, त्यानंतर सर्व युवकांना वाहनातुन मोर व कोल्हापुर येथे प्रशिक्षणाकरीता रवाना केले.

सेवा सामाजिक विकास संस्था सातारा यांचे माध्यमातुन एकुण १० युवक व युवतींनी ६० दिवसाचे हॉटेल मॅनेजमेंट व मॉल प्रशिक्षण या कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सदर युवक व युवतींना मा. पोलीस अधीक्षक, समीर शेख यांचे हस्ते प्रशिक्षण पूर्ण झालेचे प्रमाणपत्र तसेच सदर युवक व युवतींना पुणे व सातारा या ठिकाणी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध झालेचे ऑफर लेटर वाटप करण्यात आलेले आहे.

सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था, सेवा सामाजिक विकास संस्था सातारा यांचे संयुक्त विद्यमानाने १. दुचाकी रिपेअरिंग / मॅकेनीकल, २. चारचाकी रिपेअरिंग/मॅकेनीकल ३. हॉटेल मॅनेजमेंट, ४. असिस्टंट इलेक्ट्रीशियन, ५. प्लंबिंग, ६. वेल्डींग, ७. मॉल प्रशिक्षण या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता कोल्हापूर, भोर जि. पुणे, अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. आजअखेर उंच भरारी उपक्रमाअंतर्गत एकुण ८४६ युवक व युवतींना प्रशिक्षण व रोजगार प्राप्त झालेला आहे. तसेच या योजनेत समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट