गोंदिया स्थानिक गुन्हे शाखा पथकाची जुगार अड्ड्यावर धाड कारवाई..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-10 जुगाऱ्यांना जुगार खेळ खेळतांना घेराव घालून शिताफीने घेतले ताब्यात

किमती-2 लक्ष 69 हजार 310/- रूपयांचा मुद्देमाल जप्त….जुगाऱ्यां विरुद्ध गुन्हा नोंद…

➖पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी धाडी घालून दर्जेदार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत..

मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंदया विरूद्ध प्रभावी धाड मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे……या अनुषंगाने दिनांक- 20/08/2024 रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी 19.05 वा. ते 20.00 वा. च्या सुमारास पोलीस ठाणे गोरेगाव हद्दीतील मौजा- मुंडीपार परिसरात सापळा रचून धाड टाकून कारवाई केली असता 52 तास पत्यावर पैशांची बाजी लावून हारजीत चा जुगार खेळ खेळणाऱ्या 10 इसमांना मोठ्या शिताफीने घेराव घालून ताब्यात घेण्यात आले……. तास पत्त्यावर जुगार खेळ खेळणाऱ्या इसमांच्या ताब्यातून आरोपीतांचे अंगझडतीत आणि फळावरील रोख रक्कम 19,500/- रु., एकूण 8 नग मोबाईल फोन किमती 59,150/- रु. तसेच तिन मोटर सायकली किंमती 1,90,000/- रु., व तासपत्ती चे 12 नग कॅट किमती 660/- रु असा एकुण 2 लक्ष 69 हजार 310,/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

जुगार खेळ खेळणारे आरोपीत ईसम नामे–

1) प्रवीणकुमार मथाराम पटले वय-34 वर्ष रा. मुंडीपार ता. गोरेगाव जि.गोंदिया

2) सुजय सुशील मजुमदार, वय 45 वर्षे, रा. मुंडीपार ता. गोरेगाव जि. गोंदिया

3) डिलनसिंग त्रिलोचनसिंग समन्से, वय 36 वर्षे, रा. घुमर्रा ता. गोरेगाव जि. गोंदिया

4) विकास आनंदराव चव्हाण, वय 35 वर्षे, रा. भडंगा, ता. गोरेगाव, जि.गोंदिया

5) उमेश गोंविदराव राउत, वय 33 वर्षे, रा. मुंडीपार ता. गोरेगाव जि.गोंदिया

6) संतोष सुकलाल टेर्भेकर, वय 43 वर्षे, रा. मुंडीपार ता. गोरेगाव जि. गोंदिया

7) अमित रामदास डोये, वय 41 वर्षे, रा. पालेवाडा ता. गोरेगाव जि. गोंदिया

8) संतोष ताराचंद चौधरी, वय 23 वर्षे, रा. मुंडीपार ता. गोरेगाव जि. गोंदिया

9) देवानंद अनंतराम वाकले वय 36 वर्ष रा. घुमर्रा ता. गोरेगाव जि. गोंदिया

10) कमलेश विनोद डहारे वय-28 वर्ष रा. पालेवाडा ता. गोरेगाव जि. गोंदिया.

यांचेविरुध्द पोलीस ठाणे- गोरेगाव येथे कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे…

❇️ सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे पो. नि. दिनेश लबडे, स्था.गु. शा. यांचे मार्गदर्शनात पो. उप.नि.शरद सैदाने,पोहवा. विठ्ठल ठाकरे, तुलसी लुटे, पोशि.संतोष केदार, अजय रहांगडाले, हंसराज भांडारकर, दुर्गेश पाटील, चालक- घनश्याम कुंभलवार स्था.गु. शा. गोंदिया, यांनी केली आहे..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट