मुंबईत सुवर्णकारांचे झुंजार नेते स्व.सुर्यकांतजी वगळ यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त रुग्णांना फळवाटप…

प्रतिनिधी-महेश वैद्य
ठाकुरद्वार: मुंबईत सुवर्णकारांचे झुंजार नेते व जेष्ठ समाजसेवक स्व.सूर्यकांतजी वगळ यांच्या 58 व्या पुण्यतिथि दिनी शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका झावबावाडी, ठाकूरद्वार येथील सूर्यकांत वगळ प्रसुतिगृहातील रुग्ण, परिचारिका, आशा परिचारिका व बाह्य रुग्ण असे २०० जणांना मुंबई सुवर्णकार संघाच्या जव्हेरी बाजार विभागाकडून फळवाटप करण्यात आले.




मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मा.श्री.संपत ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचे अध्यक्ष श्री.संजय (नाना) वेदक, मुंबई सुवर्णकार संघाचे माजी सरचिटणीस श्री.रमेशभाई गुजराथी यांनी स्व.सूर्यकांत वगळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. सर्व उपस्थितांनी आदरांजली वाहिली.




याप्रसंगी नामांकीत स्त्री रोगतज्ञ डॉ. नाझिमा कुरेशी यांना मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस श्री.अदिप वेर्णेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले. त्याचप्रमाणे प्रमुख परिचारिका सौ.वंदना पाटेकर यांनाही मुंबई सुवर्णकार संघाची लिपिका कु.सोनल जाधव हिच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले.

याप्रसंगी मुंबई सुवर्णकार संघाचे उपाध्यक्ष श्री.अनिल कारेकर, संयुक्त चिटणीस श्री.रवींद्र देवरुखकर, सह.चिटणीस श्री.सतीश वैद्य, सह.खजिनदार श्री.सत्यविजय मोंडकर, कुंभारवाडा विभागाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र देवरुखकर, लालबाग विभागाचे सरचिटणीस श्री.मंगेश आचरेकर तसेच जव्हेरी बाजार विभागाचे अध्यक्ष श्री.अमरनाथ घोसाळकर, खजिनदार श्री.अमोल नारकर, श्री.संतोष सागवेकर, श्री.नितेश नारकर, श्री.देवेंद्र गुजराथी, श्री.नथुराम नारकर, सुरक्षा पोलीस टाइम्सचे पत्रकार श्री.महेश वैद्य, श्री.राजेश नारकर यांची उपस्थिती होती.


जव्हेरी बाजार विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. अमरनाथ दत्तात्रय घोसाळकर यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिल्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. त्यांच्या सोबत श्री.अमोल नारकर, श्री.संतोष सागवेकर, श्री.राजेंद्र देवरुखकर, श्री.देवेंद्र गुजराथी, श्री.सतीश वैद्य, कु.सोनल जाधव इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी जव्हेरी बाजार विभाग
अध्यक्ष – श्री.अमरनाथ घोसाळकर
सरचिटणीस -श्री.संजय गोरीवले
खजिनदार -श्री.अमोल नारकर हेही आवर्जून उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.co