मित्रांनीच त्याला जिवंत पुरले पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड, दोन तरुणांना अटक…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :– सिंहगड पोलिस स्टेशन येथे वेपत्ता नोंद असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. बेपत्ता व्यक्तीला त्याच्याच मित्रांनी जिवंत पुरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सिंहगड पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.

बसवराज मंगळुरे (वय २२, सध्या रा. वडगाव बुद्धक, मूळ रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रूपेश अरुण येनपुरे (वय २५), सौरभ बापू रेणुसे (वय २५, दोघे रा. पादे, ता. राजगड, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

बसवराज हा मित्र सौरभबरोबर १२ जुलै रोजी भात लावणीसाठी
राजगड तालुक्यातील पाबे गावात गेला होता. १३ जुलै रोजी बसवराज आणि त्याचा मित्र सौरभ, रूपेश यांच्याबरोबर रांजणे गावातील विजेच्या मनोऱ्यावर चढून तार कापून चोरीचा प्रयत्न करीत होता. त्या वेळी तार तुटून बसवराज कोसळला.

गंभीर जखमी झालेल्या बसवराजला सौरभ आणि रूपेश यांनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, दोघांनी बसवराजला रुग्णालयात नेले नाही. त्याला पाबे घाटाजवळील जमिनीत खड्डा करून जिवंत गाडले. दरम्यान, बसवराज बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आईने सिंहगड रस्ता पोलिसात तक्रार दिली. तक्रारीत तिने रूपेश आणि सौरभवर संशय व्यक्त केला होता.

सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय यांनी रूपेशला ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक त्याला घेऊन पावे गावात पोहोचले. वेल्हे पोलिस, तसेच निवासी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत सौरभने पोलिसांना खड्डा दाखविला. पोलिसांनी संबंधित गुन्हा वेल्हे पोलिसांकडे सोपविला आहे.
आरोपी सौरभ आणि त्याचा मित्र रूपेश यांना वेल्हे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट