रात्रीचेवेळी दुकानांचे शटर उचकटुन चोरी करणारे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांच्या कोंढवा पोलीसानी आवळल्या मुसक्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-दिनांक ०९/०८/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये वाढलेल्या घर फोडी तसेच चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पो.अं. संतोष बनसुडे व पो.अं. शाहिद शेख यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.रजि. नं.९४०/२०२४ भारतीय न्याय संहिता अधिनियम सन २०२३ चे कलम ३३१ (४), ३०५ हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे अमोल अवचरे रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे याने व त्याचा साथीदार नामे तौसिफ रा. कोंढवा, पुणे यांनी मिळुन केलेला आहे.

अशी खात्रीलायक बातमी मिळाली. सदर बातमीप्रमाणे मा. विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन यांचे आदेशाने पोउपनि बालाजी डिगोळे व पोलीस स्टाफ असे आरोपी नामे अमोल अवचरे रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे याचा शोध घेणेकामी कासेवाडी, भवानी पेठ, पुणे येथे गेलो असता सदर कासेवाडी परिसरात आरोपीचा शोध घेत असताना आरोपी अमोल अवचरे हा त्याच्याकडील काळ्या रंगाच्या होंडा डिओ दुचाकी गाडी क्र. एम.एच/१२/एन.आर/६२४० हिचेवरुन जाताना दिसुन आला.

त्यावेळी सदर इसम हाच आरोपी अमोल अवचरे असल्याचे
बातमीदाराने सांगुन बातमीदार सदर ठिकाणाहुन निघुन गेला. त्याप्रमाणे लागलीच पोलीस स्टाफने त्यास पाठलाग करुन कासेवाडी लगत असलेल्या जैन मंदीराचे समोरील सार्वजनिक रोडवर थांबवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अमोल किसन अवचरे, वय २७ वर्षे, रा. कॉलनी नंबर १० समोर, म्हसोबा मंदीरा शेजारी, कासेवाडी, भवानी पेठ, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास त्याचेकडे असलेल्या दुचाकी गाडीबाबत तसेच गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे तौसिफ रा. कोंढवा, पुणे याचेसह केला असल्याचे सांगितले.

तसेच सदर गुन्हा करताना त्याच्याकडे असलेली होंडा कंपनीची डिओ दुचाकी गाडी क्र. एम.एच/१२/एन.आर/६२४० ही वापरली असल्याचे सांगितल्याने सदर २५,०००/- रु. कि.ची होंडा डिओ दुचाकी, तसेच सदर गाडीच्या डिकीमध्ये १००/- रु. किं.चा एक धारदार लोखंडी कोयता, तसेच गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एक ५,०००/- रु.कि.ची १०० ग्रॅम वजनाची श्री कृष्णाची चांदीची मुर्ती त्यास सोनेरी पॉलिश केलेली तसेच १३,५००/- रु.किं.ची एकुण २७ नग चांदीचे नाणे मिळुन आले आहे.

सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करुन त्याचेकडे अटक मुदतीत तपास करुन त्याने व त्याचा साथीदार तौसिफ शेख रा. कोंढवा, पुणे तसेच यश गायकवाड रा. कासेवाडी, पुणे यांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीत शटर उचकटुन चोरी केल्याचे मान्य केल्याने त्यांचेकडुन खालीलप्रमाणे आणखीन शटर उचकटुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात कोढ़वा तपास पथकास यश आले आहे.

१) कोंढवा पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ८३७/२०२४ भा.न्या.सं. कलम ३३१ (४),३०५

२) कोंढवा पोलीस स्टेशन गु.रजि. नं. ८५३/२०२४ भा.न्या.सं. कलम ३३१ (४),३०५

३) सिंहगड पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ४२३/२०२४ भा.न्या.सं. कलम ३३१(३),३३१ (४),३०५

सदर आरोपीकडुन वरील गुन्ह्यांतील मुद्देमाल त्यामध्ये सोन्याची वेढणी, चांदीचे कॉईन, मुर्ती व ब्रेसलेट, डिव्हीआर च इंटरनेट डिस्ट्रीब्युटर व एकुण ५ रेडमी कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण १,१७,६००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुद्ध यापुर्वीचे कोंढवा पोलीस स्टेशन येथे ०२, खडक पोलीस स्टेशन येथे ०४, लष्कर पोलीस स्टेशन येथे ०३, स्वारगेट पोलीस स्टेशन येथे ०३, येरवडा, लोणीकंद, चंदननगर, पिंपरी येथे प्रत्येकी ०१ असे यापुर्वीचे एकुण १६ गुन्हे नोंद आहेत.

वरिल नमुद कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. आर. राजा, पोलीस उप-आयुक्त परि.०५, मा.धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, श्री.मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक बालाजी डिगोळे, सपोनि लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, पोलीस अंमलदार गोरखनाथ चिनके, शाहीद शेख, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, सुरज शुक्ला, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट