डॉ ओमप्रकाश शेटे प्रमुख आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती महाराष्ट्र शासन यांचा पालघर दौरा…

प्रतिनिधी. मंगेश उईके
पालघर:-आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे यांनी बुधवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ रोजी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पालघर जिल्हा कार्यालयामध्ये आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा आढावा घेण्यात आला, यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, निवासी जिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ रामदास मराड, उप जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ शशिकांत साळुंखे . वसई महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी तसेच आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी व योजनेअंतर्गत रुग्णालयांचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र शासनाने २८ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व कुटुंबांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि विद्यमान योजनेची व्याप्ती वाढवली आहे. त्यानुसार १ जुलै २०२४ पासून विस्तारित व्याप्तीसह एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे. एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही भारतातील रोख रक्कम विरहीत मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचा समावेश आहे आणि रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या व्दितीय व तृतीय प्रकारच्या आरोग्य सेवांसाठी प्रति वर्ष प्रति कुटुंब १३५६ आजारासाठी ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच प्रदान करते.
पालघर जिह्यामध्ये मागील वर्षी ७७९१ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये १७ रुग्णालये अंगीकृत आहेत त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा यामध्ये उपजिल्हा रुग्णालय डहाणू, उपज
उपजिल्हा रुग्णालय कासा, पतंगशहा कुटीर रुग्णालय जव्हार, ग्रामीण रुग्णालय पालघर, अधिकारी लाईफ लाईन हॉस्पिटल नागझरी बोईसर, आस्था हॉस्पिटल मनोर पालघर, दयानंद हॉस्पिटल तलासरी, डॉ एम एल ढवळे हॉस्पिटल पालघर, अलाइन्स हॉस्पिटल नालासोपारा, जनसेवा हॉस्पिटल वसई, स्वामी श्रद्धानंद हॉस्पिटल नालासोपारा, संजिवनी हॉस्पिटल विरार, स्टार हॉस्पिटल नालासोपारा, विजयालक्ष्मी हॉस्पिटल नालासोपारा, श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल विक्रमगड, क्वालिटी केयर डायलिसिस सेंटर डहाणू, प्लॅटिनम हॉस्पिटल वसई, तसेच पालघर जिल्ह्यातील नवीन रुग्णालयाने योजनेमध्ये अंगीकृत होतील तसेच
महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील रुग्णालये या योजनेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात विचाराधीन आहेत.
पालघर जिल्ह्यामध्ये आयुष्मान भारत योजनेचे आयुष्मान कार्ड एकूण लाभार्थी संख्या 2677827 एकूण आयुष्मान कार्ड वाटप 721377 एकूण आयुष्मान कार्ड पेंडिंग 1956450 पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले व कुटुंबातील सर्वांचे आयुष्मान कार्ड काढून घ्यावे असे आव्हान डॉ ओमप्रकाश शेटे यांनी केले तसेच हे कार्ड लाभार्थी स्वतः आयुष्मान अँप मधून काढू शकतो, तसेच आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center), आशा सेविका, राशन दुकानदार यांच्याकडे जाऊन आयुष्मान कार्ड काढू शकतात. तसेच आपले सरकार सेवा केंद्र मार्फत प्रत्येक राशन दुकानांमध्ये कॅम्प घेऊन विशेष मोहीम राबून आयुष्मान कार्ड जिल्ह्यातील सर्व लाभार्थीना काढून द्यावेत अश्या सुचना डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आपले सरकार सेवा केंद्र यांना दिलेल्या आहेत. कातकरी लाभार्थीसाठी विशेष मोहीम राबून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल अश्या सूचना करण्यात आली
योजनेविषयी माहिती जाऊन घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक १५५३८८ व १८००२३३२२०० किंवा अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्राशी संपर्क करावा करावा असे आवाहन डॉ ओमप्रकाश शेटे यांच्यामार्फत करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com