पालघर रेल्वेमार्ग पोलीसांतर्फे दुर्मिळ जातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण संपन्न. .

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर :- दिनांक १ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई लोहमार्ग आयुक्तालय अंतर्गत पालघर लोहमार्ग पोलिस ठाणे येथील रेल्वे पोलीस दल पालघर, आयोजित वृक्ष रोपण कार्यक्रम वाघोबा घाट ते देवखोप मुख्य रस्त्या लगतच्या परिसरात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला आयु.विक्रम दिपक गावंडे यांनी वड, पिंपळ तसेच मोहगन या निसर्गातुन लुप्त होत असलेल्या झाडांच्या दुर्मिळ जाती पुन्हा संगोपीत व्हाव्यात व पशु पक्षी यांना अन्न व आश्रय मिळावा तसेच निसर्गाचा समतोल राखता यावा या हेतूने रेल्वे पोलीस कर्मचार्यांना सोबत घेऊन स्तुत्य उपक्रम यशस्विरित्या पार पाडला व मा.पो.निरीक्षक साहेब यांना सप्रेम भेट म्हणुन बांबु चे छोटेसे रोपटे देण्यात आले.
या कार्यक्रमाला मा. पो. निरीक्षक श्री.सचिन इंगवले साहेब , श्री.डॉ.गजानन पाईकराव साहेब ,उपसरपंच शेलवाली ग्रामपंचायत श्री.राजु लडे, आयु.विक्रम दिपक गावंडे,आयु.प्रज्वल कैलास तायड़े, आयु.सोनुभाई शेख व कष्टकरी मजुर यांचे श्रमदानातून मोलाचे सहकार्य लाभले तसेच सर्व मा. सहकारी पोलिस कर्मचारी यांच्या हस्ते हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर
आयु.विक्रम गावंडे यांनी सर्व पो.कर्मचार्यांना नाश्ता व पाण्याची व्यवस्था करून सर्वांचे मनःपुर्वक आभार व्यक्त केले. सदर उपक्रम राबविण्या करीता मा.श्री.डॉ.गजानन पाईकराव साहेब यांनी विशेष प्रयत्न केले व साहेब नेहमी पोलिस प्रशासनाकरीता नावीन्य पुर्ण उपक्रम राबवित असतात .
🌿झाडे लावा ।। झाडे जगवा🌿
।।वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।।- संत तुकाराम महाराज
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com