पोलीस बॉईज संघटनेतर्फे पालघर पोलीस ठाण्यात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :-“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ” संत तुकाराम महाराजांच्या या शिकवणीला अनुसरून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाने पालघर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमचा आयोजन केला होता.

पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष / महाराष्ट्र शासन निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल अर्जुन दुबाले तसेच मुंबई/ पालघर जिल्हा अध्यक्ष मनीष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पालघर पोलीस नाईक (गोपनीय ) सुयोग कांबळे व मंगेश उईके पालघर जिल्हा महासचिव यांच्या नियोजनाने आज दिनांक.०४/०८/२०२४ रोजी पालघर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अनंत पराड व त्यांच्या सौ. व तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षरोपण कार्यक्रम पारपाडण्यात आला.

महाराष्ट्र पोलीस बॉईज वेळोवेळी पोलिसांना व पोलिसांच्या कुटुंबासाठी तसेच समाजाच्या सेवेसाठी तत्पर असते. आजचा कार्यक्रम हा पर्यावरणासाठी होता. पर्यावरणाच्या रक्षणासाठी होता. पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे.का तर आपले जीवन हे ऑक्सिजन शिवाय शक्यच नाही जीवनावश्यक वस्तू म्हणजे ऑक्सिजन बाकी सर्व गोष्टी भौतिक असतात पण शरीर आणि शरीर स्वास्थ्य ते ऑक्सिजनमुळे टिकून असते आपले जीवन त्यावर अवलंबून असते. आज प्रगती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते वृक्षतोड करताना तेवढेच वृक्ष लावणे आवश्यक असतात आजचा कार्यक्रम हा एक संदेश आहे. की मोठ्या वृक्षांची आपणास आवश्यकता आहे. कारण त्यांना वाढण्यास जेवढा वेळ लागतो त्यात आपल्या कईक पिढ्या गेलेल्या असतात, पण आपल्याकडून तेवढ्या वृक्षांची रोपणी होत नाही. किंवा लागवड होत नाही.त्यावर वृक्षारोपण केले जात नाही. कोरोना सारख्या आजारात ऑक्सिजनचे काय महत्त्व होते हे सर्वांना कळलेच कारण त्यावेळी ही गोष्ट आपणास विकत घ्यावी लागली.

ज्या भागात भरपूर झाडे लख्ख प्रकाश भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आहे तिथे रोगाचे प्रमाण कमी असते. आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्र पोलीस बॉईज टीम कडून भविष्यात आपल्या पोलीस परिवारांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन पुरवण्यासाठी या मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात आली त्यात वडवृक्ष, कडूलिंबडा, राणावळा, पिंपळ, अशा वृक्षांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा महासचिव मंगेश उईके व संघटनाच्या टीमने तसेच .पालघर पोलीस नाईक (गोपनीय )सुयोग कांबळे यांनी केले.व या कार्यक्रमला प्रमुख अतिथी पालघर पोलीस निरीक्षक अनंत पराड साहेब आणि त्यांच्या सौ.यांनी सहभाग घेत.तसेच या कार्यक्रमात त्यांचे पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण मध्ये सहभाग घेऊन या पर्यावरणाबद्दल त्यांचे प्रेम आणि प्रदूषणाबद्दलची जागरूकता दिसून आली.

तसेच या कार्यक्रमाला विशेष आभार संदेश मोरे / संजय राऊत . यांनी झाडाचे रोप दिल्याबद्दल यांचे विशेष आभार. व तसेच या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर पालघर पोलीस निरीक्षक अनंत पराड साहेब. व त्यांच्या सौ. व पालघर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी व पोलीस बॉईज संघटना पालघर टीम सर्व मान्यवर उपस्थितीत होते.
शितल उईके महिला पा. जि.उपअध्यक्ष
संजय राऊत जिल्हा सल्लागार
संदेश मोरे पा.ता. अध्यक्ष
किरण पाटील पा .ता सचिव
स्वामीनाथ निषाद पा. ता. कार्याध्यक्ष
अमोल गायकवाड पालघर संघटक
भूपेंद्र ठाकरे सदस्य
मनीष कांबळी सदस्य
पंकज मंडळ सदस्य
निलेश चव्हाण सदस्य
प्रमोद उईके.आणि
मंगेश उईके जिल्हा महासचिव.
( सुरक्षा पोलीस टाईम्स प्रतिनिधी ) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
जणू असे जाणवले की आम्ही एका शाळेचे विद्यार्थी आहोत आणि वृक्षारोपणासाठी आलेलो आहोत आम्ही आमचे वय पण विसरलो संत तुकाराम महाराज म्हणतात ते खरंच वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. अशाप्रकारे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट