गोंदिया शहर पोलीसांनी गुंड अमित चिंडाले , सुमित चिंडाले आणि शुभम चौधरी यांना ३ महीन्याकरीता केले तडीपार…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– आगामी सण उत्सवाच्या निमीत्ताने गोंदिया शहर पोलीसांची धडक कारवाई..
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे सराईत गुंड क्र.
1) अमित ऊर्फ गुलशन महेंद्रसिंग चिंडाले, वय 26 वर्षे, रा. दसखोली मरघट रोड गोंदिया याचे विरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे जबरी चोरी, सामुहीक बलात्कार, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा घालण्याची पूर्व तयारी, लोकसेवकावरील हल्ल्ला, इच्छापूर्वक दुखापत, अवेध शस्त्र बाळगणे, दरोडा, अपहरण, दुखापत, नुकसान काम आगळीक करणे, धमकी, समान उद्देश, विनयभंग या सारखे 12 गंभीर गुन्हयांची नोंद असून सराईत गुंड क्र. 2) सुमित महेन्द्रसिंग चिंडाले वय 28 वर्ष, रा. दसखोली मरघट रोड, गोंदिया याचे विरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे घरफोडी, घरातील चोरी, दरोडा, चोरी, दुखापत, नुकसान करून आगळीक करणे, धमकी देणे या सारखे 6 गंभीर गुन्हे तसेच सराईत गुंड क्र. 3) शुभम ऊर्फ हग्णू ऊर्फ मास जनुजी चौधरी चय- 20 वर्ष, रा. सुंदरनगर , गोंदिया याचे विरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे घरफोडी, चोरी, गैर कायद्याची मंडळी, दुखापत, खुनाचा प्रयत्न, खून, अवैध शस्त्र बाळगणे या सारखे 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
नमूद सराईत गुंडांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य लोकांचे मनात दहशत, भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोंदिया शहरातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला भयमुक्त जिवन जगता यावे याकरीता गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक यांनी सदर तिन्ही सराईत गुंडांना गोंदिया, भंडारा, आणि बालाघाट जिल्हयातून तडीपार करण्याकरीता कलम 56 महाराष्ट्र पोलीस अधिनीयमान्वये मा.उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचे कार्यालयात प्रस्ताव सादर केलेला होता….सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्रीमती पर्वणी पाटील, उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांनी प्रस्तावाची शहानिशा व चौकशी करून सराईत गुंड ईसंम नामे- .
1) अमित ऊर्फ गुलशन महेंद्रसिंग चिंडाले, वय 26 वर्षे, रा. दसखोली मरघट रोड गोंदिया,
2) सुमित महेन्द्रसिंग चिंडाले वय 28 वर्ष, रा. दसखोली मरघट रोड, गोंदिया,
3) शुभम ऊर्फ हग्णु ऊर्फ मास जनुजी चौधरी वय- 20 वर्ष, रा. सुंदरनगर, गोंदिया
अश्या तिघांचे उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांनी दिनांक 29/07/2024 रोजी तडीपारीचे आदेश काढून तिन्ही सराईत गुंडांना 3 महीन्याकरीता गोंदिया, भंडारा व बालाघाट या जिल्हयातुन तडीपार केले आहे.
पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर, मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते , दिनेश् लबडे ( स्थानिक गुन्हे शाखा), मपोउपनि वनिता सायकर, अमलदार प्रकाश गायधने ,दूर्गेश् तिवारी, दिनेश् बिसेन, यांनी तसेच गोंदिया शहर येथील पो.हवा.निशिकांत लोंदासे, दिनेश बिसेन व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी नमूद सराईत गुंडांना जिल्हयातून तडीपार करण्याची कारवाई केलेली आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस तर्फे आणखी सराईत गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.. विशेष म्हणजे याच महिन्यात गोंदिया जिल्हा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुंड- राजकुमार शिवशंकर विश्वकर्मा रा. पैकनटोली गोंदिया यास सुध्दा दि. 2/07/2024 रोजी तडीपार करण्यात आले आहे… सदरची कारवाई केल्याने गोंदिया पोलीस ठाणे शहर हद्दीतील सर्वसामान्य जनतेने प्रशंसा केली असून गोंदिया जिल्हा पोलीस व गोंदिया शहर पोलीसांचे आभार मानले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com