रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ )पालघर तालुका व बजरंग दल यांच्या वतीने निषेध निदर्शने…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर :-दि.२८ जुलै २०२४ रोजी नवी मुंबई उरण येथे कु. यशश्री शिंदे या २२ वर्षीय दलित मुलीची माथेफिरू तरुण दाऊद शेख याने तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून अमानुष पणे निर्घृण हत्या केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.अशा प्रकारच्या घटना राजरोसपणे महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात घडताना दिसत आहेत. सदर घटना ही लव जिहाद प्रवृत्तीची आहे . अजून पर्यंत किती निष्पाप मुलींचे जीव जाणार आहेत या घटनेचा रिपाई(आ ) व बजरंग दलाच्या वतीने जाहीर निषेध करून पालघर शहरात पाचबत्ती येथे निषेध व निदर्शने करण्यात आली. या घटनेतील आरोपी दाऊद शेख याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अलीकडे भिवंडी, वसई तालुक्यात सुद्धा अशीच घटना घडली.तसेच अरविंद वैश्य रा. धारावी या तरुणावर गेल्या काही दिवसापूर्वी सात ते आठ तरुणांनी जिहादी मानसिकतेतून अमानुषपणे धारदार शस्त्राने वार करून क्रूरपणे हत्या केली. महाराष्ट्रातील सर्व घटनेचा आढावा घेता अशा घटना वारंवार घडू नये यासाठी शासनाच्या वतीने कठोरात कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने अशा घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनास कठोरात कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश द्यावे.संशयित व गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांवर करडी नजर ठेवून कारवाई करून अशा घटनांना आळा बसू शकतो. अशा मागणीचे निवेदन (रिपाई आ.)च्या वतीने मा.तहसीलदार पालघर तसेच मा. पोलीस निरीक्षक पालघर यांना देण्यात आले.



यावेळी आयु.सुरेश जाधव (पालघर जिल्हाध्यक्ष रिपाई आ.)मुकेश दुबे ( जिल्हाध्यक्ष बजरंग दल पालघर प्रखंड) रिपाई चे नवीन भाई त्रिपाठी (उपाध्यक्ष पालघर जिल्हा) रोहिणी गायकवाड (महिला अध्यक्षा पा. जि.)नरेंद्र करणकाळे (पालघर तालुका अध्यक्ष ) राजकुमार यादव (संघटक पालघर जिल्हा ) जब्बार सोलंकी ( संघटक पालघर जिल्हा )श्यामराव खरात (संघटक पालघर जिल्हा )शरद जाधव (युवा अध्यक्ष पा. ता.) जागृत जाधव ( उपाध्यक्ष पा. ता.)राम ठाकूर ( युवा उपाध्यक्ष पा. ता.) सचिन घाडीगावकर (युवा संघटक पा.ता.) वर्षाताई काटेला (महिला अध्यक्षा पा.जि. अनु. जमाती सेल )संजोग उपाध्याय (म.आ. संघटक पा. जि.)राजू शेख (युवा सहसंघटक पा. ता. )विमल चौधरी( महिला उपाध्यक्ष पा.जि.)युवा कार्यकर्ते दीपेश गायकवाड,संकेत वरठा,धनश्री जाधव. बजरंग दलाचे श्रीपाद पाटील (पालघर तालुका अध्यक्ष )प्रभात ठाकूर (पालघर प्रखंड) संतकुमार मल्लाह (सुंदरम प्रखंड) उमासिंग (पालघर जिल्हा मंत्री) आकाश नारखेडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com