मोटार सायकल चोरी करणारे २ आरोपी संजय नगर पोलीसांनी केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-संजयनगर पोलीस ठाणे
अपराध क्र आणि कलम गु.र.नं. १३१/२०२४ ची.एन.एस. २०२३ कलम ३०३(२) प्रमाणे
फिर्यादी नाव
विजय रामचंद्र देसाई, रा. संभाजीनगर, जयसिंगपुर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.
गु.प.ता वेळ
मु.दा.ता वेळ
ता. २४/०७/२०२४ रोजी १४.५१ वा.
माहिती कशी प्राप्त झाली पोशि/१६०२ सोमनाथ पतंगे पोशि/१३४ अजय बेंदरे,
दि. १८.०७.२०२४ रोजी सकाळी १०.३० वा ते दुपारी १४.०० वा चे दरम्यान
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्था. गु. अ. शा, पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील, पोहेकों / हर्णमत लोहार, संकेत मगदूम, अमर नरळे, पोना/ सोमनाथ गुंडे, श्रीधर बागडी, पोशि/ सोमनाथ पतंगे, अजय बंदरे, सुनिल जाधव, स्था. गु. अ. शा, पोकों/
कॅप्टन गुंडचाडे, विजय पाटणकर, सावचर पोलीस ठाणे.
अटक वेळ दिनांक दि.२६/०७/२०२४ रोजी आरोपीचे नांव पत्ता
१. सागर धनाजी लोखंडे, वच ३४ वर्षे, रा. संपत चौक, साखर कारखान्यासमोर, माधवनगर, सांगली, २. राज दऱ्याप्पा यादव, वय २४ वर्षे, रा. चितामणीनगर झोपडपट्टी, आर टी ओ ऑफीसजवळ, माधवनगर, सांगली.
जप्त मुद्देमाल १. ५०,०००/- रु. किंमतीची एक हॉण्डा कंपनीची पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा मोटार सायकल जु. वा. कि. अं.
५०,०००/- (पन्नास हजार रुपये) गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक संदीप पुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेयर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरी करणारे संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने दि.२६/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकातील पोशि / सोमनाथ पतंगे व अजय बंदरे यांना गोपनिय चातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे सागर धनाजी लोखंडे हा अहिल्याबाई होळकर चौकात चोरीची पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा मोटार सायकल विक्री करण्याकरीता आला आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे अहिल्याबाई होळकर चौक परिसरात जावून निगराणी करत असताना, दोन इसम पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा मोटार सायकल क्रं. एम एच ०९ सी.पी. ०८१३ जवळ रोड कडेला थांबलेले दिसले. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांची नावे व गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) सागर धनाजी लोखंडे, वय ३४ वर्षे, रा. संपत चौक, साखर कारखान्यासमोर, माधवनगर, सांगली. २) राज दऱ्याप्पा यादव, वय २४ वर्षे, रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी, आर टी ओ ऑफीसजवळ, माधवनगर, सांगली असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष त्यांचेकडे असलेल्या मोटार सायकलीच्या मालकी हक्काबायत विचारणा केली असता, धनाजी लोखंडे याने सांगितले की, तो व त्याचे सोचत असलेला राज यादव यांनी मिळून काही दिवसापुर्वी शांतीनिकेतन कॉलेजच्या पार्किंगमधुन अॅक्टीव्हा मोटार सायकल चोरी केली असल्याचे कबूल केले. सदर मिळालेल्या अॅक्टीव्हा मोटार सायकल बाचत संजयनगर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख पडताळला असता, मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच सदरची अॅक्टीव्हा मोटार सायकल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केली.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन, पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com