जबरीने मोबाईल हिसकावून नेणारे दोघेजण स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पथकाने केले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- ▶️ याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात चोरी, घरफोडी, मो. सा. चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबतचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले आहेत.

या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश सूचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे, पथक पो. नि. श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यातील चोऱ्या , घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांचा कशोशिने शोध घेवून गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

घटना दिनांक- 22/07/2024 रोजी फिर्यादी- रतनलाल फत्तुलाल दमाहे रा. नवेगाव सालेकसा हे आमगाव वरून आपले गावी मोटार सायकलने जात असता साखरीटोला (झालीया) येथील नदीकाठावर असलेले शिवमंदिरच्या समोर दोन अनोळखी ईसमांनी फिर्यादीच्या मोटार सायकलला थांबविण्याचा ईशारा दिल्याने फिर्यादी हा थांबुन मोटार सायकलच्या खाली उतरल्यावर त्या दोन्ही अनोळखी चोरांनी त्याचे खिशातील मोबाईल टेक्नो कंपनीचा मोबाईल किमती 5000/- रू. व मोबाईलच्या कवरमध्ये असलेले नगदी 150/-रू. असा मुद्देमाल बळजबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेले असून फिर्यादीच्या रिपोर्टवरून पो. ठाणे सालेकसा येथे अपराध क्रमांक- 227/2024 कलम 304(2), 3 (5) भारतीय न्याय संहिता- 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून तपासात आहे……पथक सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना पथकास सदर गुन्ह्यातील अज्ञात संशयित आरोपी हे आमगाव येथील असल्याची खात्री लायक माहिती प्राप्त झाली त्यावरून पथकाने – संशयित आरोपी नामे –

1) धनराज रामचंद मच्छीरके वय 31 वर्ष राहणार वार्ड क्रमांक पाच गुरुदेव नगर खामगाव पावर हाऊस जवळ

2) सागर केवलचंद भोंडे वय 30 वर्ष वार्ड क्रमांक 6 विठ्ठल नगर, आमगाव*

यांना नमूद गुन्हाचे अनुषंगाने ताब्यात घेण्यात आले…. दोन्ही संशयीतांना नमूद गुन्ह्याचे घटनेबाबत सविस्तर विचारपुस चौकशी केली असता….नमुद दोन्ही संशयित आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली….आरोपीतांचे ताब्यातून गुन्हयातील जबरीने हिसकावून नेलेला टेक्नो कंपनीचा मोबाईल किमती 5000/-रुपये व नगदी 150/- रुपये हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे. आरोपीतांना सालेकसा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास कायदेशीर कारवाई सालेकसा पोलीस करीत आहेत……गुन्हा उघडकीस आणण्यात आले आहे..

माननीय वरिष्ठांच्या निर्देशांन्वये सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे स्थानिक गुन्हे शाखा, पो . नि. भुषण बुराडे, पो.ठाणे सालेकसा, यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. महेश विघ्णे, पोलीस अंमलदार पो.हवा विठ्ठल ठाकरे, इंद्रजित बीसेन, पो.शि. अजय रहांगडाले, हंसराज भांडारकर, चा.पो.हवा लक्ष्मण बंजार तसेच तांत्रीक सेल चे दिक्षित दमाहे, रोशन येरने यांनी कामगिरी केली आहे .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट