घरफोडी चोरीचा बनाव रचनारा फिर्यादीच निघाला चोर १० लाख ६० हजार रुपये केले हस्तगत…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-चिचंणी वांगी पोलीस ठाणे
गु.र.नं.१०१/२०२४ ची.एन.एस. २०२३ कलम ३३१ (४) ३००५, प्रमाणे
फियांदी नाय :
किरण सिताराम कुंभार, रा. सुतार मला, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली.
गु.प.ता. वेळ
दि.१६.०७.२०२४ रोजी सायंकाळी १८.३२ या ते रात्री २१.४५ वा चे दरम्यान
गु.दा.ता. येळ दि.१७.०७.२०२४ रोजी ०३.४१ या.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
माहिती कशी प्राप्त झाली पोशि/५७६ अभिजीत ठाणेकर, पांशि/५८८ रोहन प्रस्ते.मा. पोलीस अधीक्षक संदीप पुगे,मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली मा. उप विभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील,
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था, गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेको । सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, पोना/ श्रीधर बागडी, पोशि / अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, सुरज थोरात, रोहन घस्ते, स्था. गु. अ. शाखा.
अटक वेळ दिनांक दि.२५/०७/२०२४ रोजी
आरोपीचे नाव पत्ता किरण सिताराम कुंभार, वय ४२ वर्षे, धंदा शेती, रा. सुतार मळा, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली.
जप्त मुद्देमाल
१. ८,००,०००/- रु किंमती ५०० दराच्या १६०० भारतीय चलनी नोटा.
२. १,८०,०००/- रु. किमती २०० दराच्या १०० भारतीय चलनी नोटा.
३. ८०,०००/- रु किंमती १०० दराच्या ८०० भारतीय चलनी नोटा.
१०,६०,०००/- (दहा लाख साठ हजार रुपये मात्र)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
चिचंणी यांगी पोलीस ठाणे हद्दीत घांगी गावातील सुतार मळा येथे फिर्यादीचे घरी घरफोडी चोरी झाली असुन सदर घरफोडी चोरीत १५ लाख २० हजार रुपये चोरीस गेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचा गुन्हा करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन सदर घरफोडी चोरीचा गुन्हा करणान्या इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.
त्या अनुशंगाने दि.२५/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकास मिळाले तांत्रीक माहितीचे विश्लेषण करून तसेच पथकातील पोशि / अभिजीत ठाणेकर, पोशि/ रोहन घस्ते यांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे, सदर गुन्हयात घरातील चोरीस गेलेली रोख रक्कम ही फिर्यादी यांनीच लपवुन ठेवून घरफोडीचा चोरीचा बनाव रचला आहे अशी माहिती मिळाली.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे चिचंणी यांगी पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी किरण सिताराम, कुंभार याचेकडे कौशल्यपुर्ण सखोल तपास केला असता, गुन्हयात चोरीस गेलेली रोख रक्कम ही त्यानेच राहत्या घरामध्ये लपवून ठेवली असल्याचाबत तपासामध्ये माहिती दिली. सदर घरफोडी चोरीचा चनाव रचण्या पाठीमागचे कारण विचारले असता, किरण कुंभार याने सांगितले की, सदरची रोख रक्कम त्याच्या भाच्याने थोड्या दिवसाकरीता विश्वासाने ठेवण्याकरीता दिली होती परंतु त्यातील काही रक्कम त्याने स्वतः साठी खर्च केली होती त्यामुळे सदरची रक्कम भाच्यास परत दयावी लागु नये व इतर रक्कम श्वतः वापरायला मिळेल यासाठी त्याने ती रक्कम स्वतःच्याच घरी लपवून ठेवून स्वतःच कपाटातील साहीत्य अस्ताव्यरत करून घरफोडी चोरीचा बनाव तयार केला आणि स्वतःच्या घरी घरफोडी होवून १५ लाख २० हजार रुपये रक्कम चोरी झालेचाबत स्वतःच फिर्याद देवून गुन्हा दाखल केला असल्याची कबूली दिली.
तात्काळ सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकाने वांगी येथे जावून किरण कुंभार याने त्याचे घरात लपवून ठेवलेली एकूण १०,६०,००० रुपये रक्कम पंचासमक्ष जप्त केली.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी चिचंणी यांगी पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास चिचंणी यांगी पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com