सांगली पोलीसांनी घरफोडी चोरी करुन पळुन जाणारा आरोपी मंगेश भारते यांस कसे केले जेरबंद पहा..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-१७,४३,५००/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत.
संजयनगर पोलीस ठाणे

गु.र.नं.१३४/२०२४, बी. एन. एस. २०२३ कलम ३०५ (ए), ३३१(३) प्रमाणे,

फिर्यादी नाव नितीन संभाजी पाटील, रा. वरद विश्व अपार्टमेंट, घनशामनगर, सांगली.

गु.घ.ता वेळ

गु.दा.ता वेळ

दि.१९/७/२०२४ रोजी दुपारी १२.१५ वा ते १३.१० चे दरम्यान

ता. १९/७/२०२४ रोजी २०.०३ बा.

पोना / १५३८ प्रकाश पाटील, सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकौं / १०२५ हणमंत लोहार

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन,
पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकों / हणंमत लोहार, दरिचा बंडगर, सागर लवटे, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, अरुण पाटील, बाबासाहेब माने, अमर नरळे, पोना/ प्रकाश पाटील, सोमनाथ गुंडे, उदय माळी,
पोशि / सुनिल जाधव, सुरज थोरात, अजय बंदरे, सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते, स्था. गु. अ. शाखा,
पोशि/ कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे.

अटक वेळ दिनांक दि.२५/०७/२०२४ रोजी

आरोपीचे नांव पत्ता

मंगेश येताळा भारते, वय २७ वर्षे, रा.
माथलमुठी, ता. खानापुर, जि. सांगली.

उघड गुन्हे

१. संजयनगर पोलीस ठाणे गु.र.नं.१३४/२०२४, बी. एन. एस. २०२३ कलम ३०५ (ए), ३३१(३) प्रमाणे.

२. संजयनगर पोलीस ठाणे गु.र.नं. १३५/२०२४, बी. एन. एस. २०२३ कलम ३०५ (ए), ३३१(३) प्रमाणे.

३. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २२६/२०२४ बी. एन. एस. २०२३ कलम ३०५ (ए), ३३१(३) प्रमाणे.

४. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २२७/२०२४ बी.एन.एस.२०२३ कलम ३०५(ए), ३३१(३), ३३१(४)

५. विटा पोलीस ठाणे, गु.र.नं. ३००/२०२४ बी. एन. एस. २०२३ कलम ३३१(३), ३०५ (ए), ३(५) प्रमाणे.

जप्त मुद्देमाल १. १६,६६,०००/- रु. किंमतीचे एकूण २४५ ग्रॅम वजनाचे दागिने त्यात सोन्याची बोरमाळ, मंगळसुत्र, चेन, गंठण, कर्णफुले, वेल, रिंग, बदाम, वेढण, नथ, झुबे, ब्रासलेट, नेकलेस असे

किंमत चालु बाजार भावाप्रमाणे.

२. २,५००/- रु. किंमतीचे एकूण २५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने त्यात २ पैजंण असे जु. वा. किं. अं. ३. ७५,०००/- रु. किंमतीची होण्डा कंपनीची अॅक्टीव्हा मोरपंखी रंगाची मोटार सायकल जु. वा. किं. अं.

१७,४३,५००/- (सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपये)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत

सांगली, कवलापुर, विटा शहर परीसरात दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत
असल्याने मा. वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देवून वेळोवेळी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि.२५/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकास मिळाले तांत्रीक माहितीचे विश्लेषण करून तसेच पथकातील पोना / प्रकाश पाटील, सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकी / हर्णमत लोहार यांना त्यांचे बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, इसम नामे मंगेश भारते रा. माधलमुठी हा मोरपंखी रंगाच्या दुचाकी मोपेड अॅक्टीव्हा परुन चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी लोकल बोर्ड कॉलनी, सांगली येथे येणार आहे.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, लोकल बोर्ड कॉलनी परीसरात सापळा लावून थांबले असता, मोरपंखी रंगाच्या मोपेड अॅक्टीव्हा मोटार सायकल क्र. एम एच १० डी ई ४४५२ वरुन एक इसम संशयीतरित्या येवून थांचलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव मंगेश येताळा भारते, वय २७ वर्षे, रा. माधलमुठी, ता. खानापुर, जि. सांगली असे असलेचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात मोपेड मोटार सायकलचे डिकीमध्ये वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला. त्याचेकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागितले की, त्याचेजवळ मिळून आलेले सोन्या चांदीचे दागिने त्याचे ओळखीचे १) बचलुसिंग टाक, २) संगतसिंग कल्याणी दोन्ही रा. पुणे यांनी काही दिवसापुर्वी विठा, कवलापुर व सांगलीत घरफोडी चोरी केली होती. सदर चोरीत मिळालेले दागिने हे विक्री करणेकरीता त्याचेजवळ दिले होते. ते दागिने विक्री करणेकरीता तो आला असल्याची कबूली दिली. सदर बाचत विटा, सांगली ग्रामीण व संजयनगर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कब्जात मिळालेलेसोन्या चांदीचे दागिने व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केले.

सदर आरोपीव जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट