एम.पी.डी.ए.कायदया अंतर्गत जळगाव जिल्हयांतील ४ गुन्हेगारांवर स्थानबध्दची मोठी कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

जळगांव :-जळगाव जिल्हयांतील रावेर पोलीस स्टेशन व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील ०४ गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत मोटी कारवाई करण्यात आलेली आहे.

१) रावेर पो. स्टे. हद्दीतील स्थानवध्द इसम शेख तौसिफ शेख अफजल वय २८ रा. पाण्याच्या टाकी जवळ फत्तेहनगर, रावेर ता. रावेर जि. जळगाव याचे विरुध्द दारुबंदी कायदया अंतर्गत ०५ गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबंध्द इसमाचा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यवती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक-५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये “धोकादायक व्यक्ती” या संज्ञेत प्रस्ताव हा रावेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक, डॉ. श्री. विशाल जयस्वाल यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे दि.२८/०६/२०२४ रोजी सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता.

त्यानुसार दि.१८/०७/२०२४ रोजी मा.श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र.दंडप्र/ कावि/एमपीडीए/२८/२०२४ अन्वये ठाणे जि.टाणे या कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे.

२) रावेर पो. स्टे. हद्दीतील स्थानबध्द इसम आय्युब वशिर तडवी वय ५५ रा. कुसुंबा ता. रावेर जि. जळगाव याचे विरुध्द दारुबंदी कायदया अंतर्गत ०५ गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबंध्द इसमाचा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाच्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक ५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये “हातभट्टीवाला” या संज्ञेत प्रस्ताव हा रावेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक, डॉ. श्री. विशाल जयस्वाल यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे दि.२२/०६/२०२४ रोजी सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता,
त्यानुसार दि.१८/०७/२०२४ रोजी मा. श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र.दंडप्र/ कावि/एमपीडीए/२५/२०२४ अन्वये मुंबई जि. मुंबई या कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे. ३) रावेर पो. स्टे. हद्दीतील स्थानबध्द इसम मगन मुरलीधर करवले वय ४३ रा. अटवाडे ता. रावेर जि. जळगाव याचे विरुध्द दारुबंदी कायदया अंतर्गत ०६ गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबंध्द इसमाचा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यवती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक ५५ सन १९८१) सुधारणा अधिनयम २०१५ अन्वये “हातभट्टीवाला” या संज्ञेत प्रस्ताव हा रावेर पो.स्टे.चे
पोलीस निरीक्षक, डॉ. श्री. विशाल जयस्वाल यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे दि.२२/०६/२०२४ रोजी सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि.१८/०७/२०२४ रोजी मा.श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र.दंडप्र/ कावि/एमपीडीए/२५/२०२४ अन्वये मुंबई जि. मुंबई या कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे.

त्यानुसार रावेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक, डॉ. श्री. विशाल जयस्वाल, पोउनि. सचिन नवले, पोउनि. घनश्याम तांबे,पोहेकों/बिजू जावरे, रविंद्र चौधरी, पोकों/सचिन घुगे, संभाजी बिजागरे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, राहुल
परदेशी, सुकेश तडवी, विकार शेख अमोल जाधव, नितीन वाघ अशांनी तिन्ही स्थानबध्द इसमास दि.१८/०७/२०२४ रोजी
ताब्यात घेतले आहे.

सदर स्थानबध्द इसम यास मध्यवर्ती कारागृह, ठाणे जि.ठाणे व मुंबई जि. मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.

४) पिंपळगाव हरेश्वर पो. स्टे. हद्दीतील स्थानबध्द इसम मनोहर ऊर्फ मोहन उखडू कोळी वय ५५ रा.लोहारी बु ता.पाचोरा जि. जळगाव याचे विरुध्द दारुबंदी कायदया अंतर्गत ०९ गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबंध्द इसमाचा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक -५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये “हातभट्टीवाला” या संज्ञेत प्रस्ताव हा पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.चे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. प्रकाश काळे यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे दि.१०/०६/२०२४ रोजी सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता.

त्यानुसार दि.१८/०७/२०२४ रोजी मा.श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र.दंडप्र/ कावि/एमपीडीए/२३/२०२४ अन्वये ठाणे जि.ठाणे या कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे. त्यानुसार पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.चे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. प्रकाश काळे, पोउनि. अमोल पवार, श्रेपोउनि. विजय माळी, पोकॉ/नामदेव रविंद्र इंगळे अशांनी तिन्ही स्थानबध्द इसमास दि. १८/०७/२०२४ रोजी ताब्यात घेतले आहे. सदर स्थानबध्द इसम यास मध्यवर्ती कारागृह, ठाणे जि. ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे.

वरील स्थानबध्द इसमाचे वर्तनात सुधारणा व्हावी म्हणून त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरी सुध्दा त्याचे वर्तनात सुधारणा झाली नसून तो पुन्हा गुन्हे करण्याची सवय सुरुच ठेवली.

वरील एम.पी.डी.ए. प्रस्ताव हे मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती अन्नपूर्णा सिंह, सहा. पोलीस अधीक्षक, फैजपूर उपविभाग, फैजपूर, मा.श्री.धनंजय येऊळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरी. श्री. ववन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व त्यांचे अधिनस्त सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी, पोहेकॉ रफिक शेख कालु, पोकॉ/ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट