आर्यन एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल पालघर येथे इंग्रजी माध्यमाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न…

0
Spread the love

प्रतिनिधी- महेश वैद्य

पालघर: मंगळवार दि.२६ सप्टेंबर २०२२ रोजी आ.ए.सो.चे. हायस्कूल मुंबई, शाळेचे माजी विद्यार्थी कै.यशवंत मोरेश्वर देवस्थळी यांनी पालघर येथील इंग्रजी माध्यम शाळेला वर्ग कमी पडत आहेत हे जाणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकामासाठी भरघोस देणगी दिली. त्या निधीतून पालघर येथील इंग्रजी माध्यमासाठी अद्ययावत वीस वर्ग बांधले गेले आहेत. या भव्य इमारतीचे उद्घाटन कै.यशवंत मोरश्वर देवस्थळी यांच्या पत्नी व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीम.लिना यशवंत देवस्थळी यांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी मा.श्रीम.देवस्थळी यांनी सांगितले की,” माझ्या पतीने दिलेल्या देणगीतून ही शैक्षणिक इमारत पूर्ण होऊन आ.ए.संस्थेच्या पालघर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे उद्घाटन माझ्याहस्ते करताना अपार आनंद झाला आणि माझ्या पतीचे स्वप्न पूर्ण साकार झाले म्हणून मी धन्य झाले”.या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त मा.किरण उमरूटकर यांनी या इमारतीच्या बांधकामासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले.

संस्था कार्यकारिणीचे सं.कार्यवाह श्री.गोपिनाथ नागरगोजे यांनी सांगितले,”दानशूर कै.देवस्थळी यांनी दिलेल्या देणगीतून उभारलेल्या या शाळेत उत्तमोत्तम व संस्कारित विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षकांनी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असावयास हवे आणि जरी ही शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी मराठीचे महत्त्व अबाधित ठेवा.” असे आवाहन केले.माजी विद्यार्थी व आर्यन संस्थेचे माजी प्रेसिडेंट मा.केदार काळे यांनी मा.श्रीम.देवस्थळी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, पैसै पुष्कळ जणांकडे असतात पण शालेय इमारतीसाठी भरघोस रक्कम देणारे फार दुर्मिळ असतात.दान देण्यासाठी दानत लागते.ती कै.देवस्थळी यांच्याकडे आहे.

तसेच त्यांनी आवाहन केले की,मी स्वतः व पालघर नगरपरिषद परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री.उत्तम मो.घरत या शाळेतील अडिअडचणीत वेळोवेळी सहकार्य करीत राहू.” तसेच संस्थेच्या कार्यकारिणी चे खजिनदार मा.किशोर खरे,वास्तुविशारद मा. श्री.राजेश पाटील. कार्यकारिणी सक्रिय सदस्य मा.संदिप का.पाटील आणि मा.राजेंद्र राऊत तसेच आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळेतील माजी मुख्याध्यापक, माजी उपमुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सांघिक नृत्य करुन कार्यक्रमाची रंगत द्विगुणित केली.तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पालघर आर्यन हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीम.स्नेहा स.सोनार यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.देवयानी राऊत यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.co

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट