नद्या, धबधबे अशा ठिकाणावर रील बनवाल तर होईल कारवाई रायगड जिल्हा पोलीसांचे आदेश जाहीर….

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव : रायगड:- माणगाव :-माणगांव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे पर्यटनासाठी आलेल्या रील स्टार अन्वी कामदार हिचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती या दुर्घटनेनंतर रायगड जिल्हा पोलीस प्रशासनतर्फे धबधबे नदी धरण डोंगर परिसरात रिल्स बनवून जीव धोक्यात घालणारे स्टंट करण्याबाबत प्रतिबधात्मक आदेश लागू करण्यात आले असून असे कोणी केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

कुभे येथील एका दरीच्या बाजूला असलेल्या कड्यावर अन्वी ही इंस्टग्रामसाठी रिल्स बनवत असताना तिचा पाय घसरून तब्बल ३०० फूट खोल दरीत कोसलेली होती,बचाव पथकाने तिचा मृतदेह शोधून रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरानी मृत घोषित जाहीर केला.सध्या नदी, धबधबे, डोंगर, धरणे, जगलं भागात अनेक पर्यटक हे पावसाळी पर्यटनासाठी जात आहेत. मात्र निसर्गाचा आनंद घेताना काहीजण आपल्या अति साहसी बेजबादारपणामुळे जीव गमावत आहेत. सोशल मीडियाच्या नांदात अन्वी हिला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकानी असे साहसी रिल्स बनवणे साहसी कृत्य करणे याला बंदी असून जिल्हा पोलीस प्रशासनंतर्फे प्रतीबंधात्मक आदेश लागू केले आहेत असे आदेसाचे पर्यटकानी पालन करा.आदेसाची पालमल्ली केल्यास कडक कारवाई केली जाईल असे आवाहन जिल्हा अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पर्यटकांना केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट