जिल्हा परिषद पालघर येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :-आज दिनांक 23 /7/2024 रोजी जिल्हा परिषद पालघर येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, संगीता भागवत आणि कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, गंगाधर निवडुंगे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. ते एक भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि स्वातंत्र्यसैनिक होते. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले लोकप्रिय नेते बनले.

त्यांना राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते. बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटीश राजवटीत स्वराज्याचे पहिले आणि खंबीर पुरस्कर्ते मानले जातात. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा नारा लोकमान्य टिळकांनी दिला होता.

अशा थोर महा पुरुषाची जयंती आज साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट