सोनाराच्या दुकानातून सोन्याची चैन घेवून पळून जाणारा गुन्हेगार साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पथकाच्या जाळ्यात..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- ▪️याबाबात थोड्क्यात हकीगत अशी की, दिनांक 19/07/2024 रोजी चे दुपारी 13.30 वाजता चे सुमारास फिर्यादी वैभव सतिशकुमार खंडेलवाल यांचे मौजा लांजी रोड, आमगाव येथील खंडेलवाल ज्वेलर्स दुकानात एक अनोळखी आरोपी ईसंम हा सोन्याची चैन खरेदी करण्याचे बहाण्याने येवून फिर्यादीच्या दुकानातून एक सोन्याची चैन अंदाजे 15. 12 ग्रॅम वजनाची किमती अंदाजे 1 लाख 21 हजार/- रू ची… घेवुन पैसे न देता दुकानातुन पळून जावून साधारण 200 मी. अंतरावर असलेल्या अनोळखी आरोपी क्र.02 साथीदाराच्या मो.सा. वर बसून पळून गेल्याचे फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पो. ठाणे आमगाव येथे अपराध क्रमांक – 305/ 2024 कलम 305(A), 3(5) भारतीय न्याय संहिता-2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले होते.
मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक करीत असताना पथकास घटनास्थळावरून प्राप्त अनोळखी व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज वरून, तसेच गोपनीय बातमीदार, यांचेकडून प्राप्त माहितीच्या आधारे संशययीत आरोपी ईसंम नामे –
1) शुभम मुन्नालाल ठाकरे, वय 20 वर्षे, रा. बटाना, ता. जि. गोंदिया
2) अभिषेक योगराज नागपुरे, वय 20 वर्षे, रा. बरबसपुरा, ता.जि. गोंदिया
यांना ताब्यात घेण्यात आले. नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने संशयितांना विश्वासात घेवून सखोल चौकशी.. विचारपूस केली असता ईसंम आरोपी नामे- याने चैन घेवून पळून आरोपी क्र. 2 साथीदारासह पळून गेल्याचे सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली… आरोपीतांचे ताब्यातून गुन्ह्यातील चोरीस गेलेली…चैन किंमती 1 लाख 25 हजार रुपयाची हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आली आहे..आरोपीतांना मुद्देमालासह आमगाव पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असुन गुन्ह्याचा पुढील तपास कायदेशीर कारवाई प्रक्रिया आमगाव पोलीस करीत आहेत..
मा. वरिष्ठांचे निर्देशान्वये सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक महेश विघ्ने, म.पो.उप.नि वनिता सायकर, पो. हवा विठ्ठलप्रसाद ठाकरे, इंद्रजित बिसेन, पो.शि. हंसराज भांडारकर, चा.पो. शि. घनश्याम कुंभलवार यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com