एकतर्फी प्रेमातून रात्री प्रेयसीचा दरवाजा ठोकला शेजाऱ्यांनी बघितल्यावर शौचालयात लपला..!
उपसंपादक-राकेश देशमुख
खरवली :-एक तर्फी प्रेमातून एका लिंगपिसाट तरुणाने रात्री एका विवाहित महिलेचा पती कंपनीमध्ये नाईट ड्युटीवर गेला असता घरात महिला एकटीच असल्याचा फायदा घेवुन तिच्या रुमचा दरवाजा जोरजोरात ठोठावला असल्याचा प्रकार महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे.
आरोपी ओमकार विठोबा लाड वय वर्षे २६ वर्षे राहणार हावरे, तालुका पोलादपूर याचे पिडीत महिलेवर एकतर्फी प्रेम होते.
त्या गोष्टीचा आरोपी याने वारंवार पाठपुरावा केला असल्याची घटना पिडीत महिलेने तिच्या पतीला सांगितल्यानंतर पतीने आरोपी ओमकार विठोबा लाड याला योग्य ती समज याअगोदर देऊन ,दोघेही पती पत्नी खरवली येथे एका बिल्डींगमध्ये राहण्यासाठी गेले होते.
आरोपी ओमकार विठोबा लाड याने पिडीत महिलेचा पती रात्री कंपनीत कामावर गेल्यावर रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास पिडीत महिलेच्या रूमचा दरवाजा जोरजोरात ठोठावला याचा आवाज आजुबाजुच्या लोकांना जाताच आरोपी ओमकार विठोबा लाड हा सार्वजनिक शौचालयात जावून लपून बसला होता.
पिडीत महिलेच्या तक्रारीवरून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी ओमकार विठोबा लाड याच्यावर भारतीय न्याय दंड संहिता कलम ७८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रविण राठोड ह करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
