जिल्हा परिषद पालघर येथे परिचर सघटनेमार्फत चौथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :-जिल्हा परिषद पालघर येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर संघटना आणि डॉ. एम.एल.ढवळे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान आज दिनांक
१९/ ७/२०२४ रोजी उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.

जिल्हा परिषद पालघर सभागृह येथे जवळपास १०४ अधिकारी व कर्मचारी पोलीस मुख्यालय चे पुरुष व महिला कर्मचारी यांनी या तपासणी व रक्तदान शिबिराचा लाभ घेतला. यावेळी 24 बॅग रक्त जमा झाले.
परिचर संघटना जिल्हाध्यक्ष तथा राज्य सह सचिव किशोर पाटील यांच्या नियोजनाखाली हे शिबिर संपन्न झाले.
डोळे तपासणी, मधुमेह,कॅन्सर स्क्रिनींग, रक्तदाब, तपासणी, तसेच ECG एच बी, इत्यादी सेवा या शिबिरा मार्फत पुरवण्यात आल्या.


या शिबिरा मधे निदान झालेल्या रुग्णाची ढवळे मेमोरियल ट्रस्ट मार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे यावेळी ढवळे चे वैद्यकीय समाजसेवक अविनाश संदनशिव आणि इतर डॉक्टर व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य शिबिराला लाभले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट