गोंदिया येथे जखमी गंगाधर चंद्रिकापुरे यास जिवे ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासात उलगडा करुन २ आरोपीतांना केले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलीसांची संयुक्त कामगिरी…

▶️ याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक 17-07-2024 रोजी चे सायंकाळी 18.40 वाजता चे सुमारास जखमी नामे – गंगाधर विजय चांद्रिकापुरे वय 40 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गौतम बुध्द वॉर्ड, गोंदिया यास घटना ठिकाण-सिंगलटोली मैदान दर्ग्याजवळ दोन अज्ञात आरोपीतांनी संगनमत करून अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने जखमीच्या पोटावर,छातीवर,शरीरावर वार करून गंभीररित्या जखमी करुन जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केले आहे..अश्या फिर्यादी भाऊ नामे- नितीन विजय चांद्रिकपुरे वय 38 वर्ष रा. लक्ष्मीनगर, गौतम बुध्द वॉर्ड, गोंदिया यांचे तक्रारी वरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक- 426/2024 कलम 109, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये दिनांक 17-07-2024 रोजी चे 23.09 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला होता…



सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी सदर प्रकरणातील गुन्हेगारांचा कशोशिने शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करून प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पो. नि. गोंदिया शहर यांना दिले होते..

मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर चे पो.नि. श्री.किशोर पर्वते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पथक आणि गोंदिया शहर चे गुन्हे प्रकटीकरण पथक अशी विविध पथके सदर प्रकरणाचा उलगडा करण्याकरीता नेमण्यात आलेली होती.आरोपीतांचे शोधाकरिता गोपनीय माहितगार नेमण्यात आले होते..अज्ञात आरोपीतांचा शोध करीत असताना घटनास्थळावरून प्राप्त माहीती परिसरातील नागरिकांची विचारपूस व गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे..जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न करणारे आरोपी नामे* — 1) प्रशांत उर्फ दद्दू सुरेश वाघमारे वय 30 वर्षे रा. सिंगलटोली, गोंदिया यांस डोंगरगड वरून स्थागुशा चे पोलीस पथकाने तसेच

2) अविनाश ईश्वर बोरकर वय 42 वर्षे रा. लक्ष्मीनगर गोंदिया यास रामटेक वरून अश्या दोघांनाही गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले आहे .

नमूद दोन्ही आरोपीतांना गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन विचारपूस चौकशी केली असता प्राथमिक तपासात यातील आरोपी क्र. 2 अविनाश बोरकर यांनी सांगितले की जखमी गंगाधर आणि आरोपी हे मिञ असून जखमी हा नेहमी आरोपी अविनाश चे पत्नीची बदनामी करीत होता.. त्याचा राग अगोदर पासून अविनाश चे मनात होता.. घटनेदिवशी सुध्दा तिघेही दारू पित असताना जखमी हा अवीनाश चे पत्नीची बदनामी करीत असल्याने दारूचे नशेत राग आल्याने स्वतः जवळ असलेल्या चाकूने जखमी गंगाधर यास जिवानिशी ठार करण्याचा उद्देश्याने जखमीचे शरीरावर वार करून जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले असून प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे….. आरोपी क्र. 1 प्रशांत उर्फ दद्दू वाघमारे यास आज मा.न्यायालया समक्ष पेश केले असता मा.न्यायालयाने आरोपीचा दिनांक 22/07/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे. मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास स.पो.नि. कदम पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत.

मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि.श्री.दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात स.पो.नि. विजय शिंदे, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तसेच पो.नि.श्री. किशोर पर्वते पो.ठाणे गोंदिया शहर, यांचे नेतृत्वात- स. पो.नि. सोमनाथ कदम,* आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी कामगिरी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट