सराईत मोटार सायकल चोर पो.ठाणे रामनगर पोलीसांचे जाळ्यात….

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :– ▶️ याबाबत थोडक्यांत माहिती अशी की, पोलीस ठाणे रामनगर गुन्हे प्रकटीकरण ( डी.बी.) पथकातील पोलीस अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पथकाने मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत… संशयावरुन आरोपी नामे- पंकज मिलकीराम सूर्यवंशी वय 23 वर्ष, राहणार मुंडीपार /खुर्द, पोस्ट- बटाणा, जिल्हा- गोंदिया. यास ताब्यात घेवुन त्याचे कडे पो. ठाणे रामनगर येथील दाखल मोटार सायकल चोरी गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपुस चौकशी केली असता त्यांनी मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितल्याने त्याचेकडुन पोलीस ठाणे रामनगर येथील दाखल गुन्ह्यातील खालील नमूद प्रमाणे दोन मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.. (1) गुहा क्र. 127/2024 कलम 379 भा.द.वि. च्या गुन्ह्यातील वाहन क्र. MH-35/U 3335 स्प्लेंडर प्रो. कंपनीची मोटर सायकल किमती 20,000/- रु. ची तसेच
(2) गुहा क्र. -156/ 2024 कलम 379 भा.द.वि. च्या गुन्ह्यातील वाहन क्र. MH-35/AU- 3028 RAIDER TVS कपंनी ची मोटर सायकल किमती- 50,000/- रु असा एकुण 70,000/- रु चा माल जप्त करण्यात आले.

सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर, मॅडम पोलीस निरीक्षक श्री. प्रविण बोरकुटे, यांचे आदेश व मार्गदर्शनात सदर गुन्हयाचा संपूर्ण तपास व कार्यवाही डी.बी. पथकातील पो.हवा. बाळकृष्ण राऊत, छत्रपाल फुलबांधे, कपिल नागपुरे, यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट