दापोलीत कुणबी ऋणानुबंध सेवा संस्थे तर्फे विद्यार्थ्यांना एम.पी.एस. सी./ यु.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षेचे विशेष मार्गदर्शन संपन्न..

0
Spread the love

प्रतिनिधी-अनंत फिलसे

दापोली :-दापोलीला रत्नांची खाण म्हणून संबोधलं जातं. याच दापोलीने मागील काही वर्षांपासून, शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत, साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. पण दहावी/बारावी परीक्षेत यशाची गरुड झेप घेणारे हे विद्यार्थी पुढे अदृश्य होऊन जातात. याचं एकमेव कारण म्हणजे, ‘योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन न मिळणे’ हे होय.

या विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा प्रकाश झोतात आणण्यासाठी दापोली स्थित कुणबी ऋणानुबंध सेवा संस्थेने एक सामाजिक शैक्षणिक चळवळ उभी केली आहे.

या चळवळीचा एक भाग म्हणून शनिवार, दिनांक ६ जुलै २०२४ रोजी कुणबी ऋणानुबंध सेवा संस्था दापोली, श्री य. रा. कुटरेकर हायस्कूल, पंचनदी व डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटी, रामराजे कॉलेज, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.

पंचनदी तसेच दापोली येथे पार पडलेल्या या शिबिराचा जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान नासा व इस्रो ला भेट दिलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार चे अधिकारी श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या ओजस्वी वक्तृत्वाने श्री. रेडकर सरांनी विद्यार्थ्यांना जवळपास तीन तास एकाच ठिकाणी खिळवून ठेवले. आपापल्या गावी जाणाऱ्या एसटी बसेस सुटणार याची कल्पना असून सुद्धा विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन मार्गदर्शन ऐकत होते.

दोन्ही ठिकाणच्या शिक्षकांनी आम्ही शिक्षक असून सुद्धाआम्हाला बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या, हे दिलखुलासपणे मान्य केले व हे निःशुल्क मार्गदर्शन तळागाळातील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या कुणबी ऋणानुबंध सेवा संस्थेचे आभार मानले.

तसेच असे कार्यक्रम वेळोवेळी आपल्या कॉलेज मध्ये त्याचप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक गावागावात व्हावेत, अशी इच्छा प्रदर्शित केली.

या कार्यक्रमासाठी कुणबी ऋणानुबंध सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री महेश महादेव पारदुले, उपाध्यक्ष श्री सुनील कानसे, सचिव अनंत भुवड, सहसचिव तुषार माने, चिखलगाव सरपंच श्री दिनेश आडविलकर, गणेश पवार, शशिकांत फिलसे, आनंद फिलसे, संदेश तेलप, महिंद्र नाचरे, सचिन महाडिक, सुरेश सुर्वे, अशोक जाधव, संजय गोरीवले इ. मुंबई व ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच श्री. य.रा. कुटरेकर हायस्कूलचे अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र कुटेकर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना मकू (पावसे), माजी मुख्याध्यापक श्री सुनील देसाई सर, सुंदर राणे, पंढरीनाथ जावळे, उत्तम येवले, आशुतोष साळुंखे, शितल कोकीळ, अजय वायंगणकर, प्रशांत जोशी, निखिल जावळे तसेच रामराजे वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर अशोक निर्बाण, रामराजे कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्या वेदिका राणे, प्रा. स्मिता बैकर, प्रा. रेश्मा तांबे, प्रा. क्षितिजा गोडबोले, प्रा. जीवन गुहागरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

आपल्या वाडीत किंवा गावातील शाळेत हे नि:शुल्क शिबिर करावयाचे असल्यास, ९०८२१९६७५८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कुणबी ऋणानुबंध सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री महेश महादेव पारदुले यांनी केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट