कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका रोहा ( गोपाळवट विभाग मुंबई ) यांच्यामार्फत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करियर मार्गदर्शन शिबिर २०२४ यशस्वी संपन्न..!!

प्रतिनिधी- मनोहर आगोंडे
मुंबई :-दि. ७ जुलै २०२४ रविवार रोजी दु. ३ वाजता दादर पश्चिम येथे उपरोक्त विभागातर्फे वरील कार्यक्रम विभागाचे अध्यक्ष श्री. तानाजी मोडक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विभागातील विद्यार्थी व पालक यांची अभूतपूर्व अशी उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री.डॉ. रोहिदास दुसार साहेब ( PH.D – presented Thesis in History, अप्पर पोलीस अधिक्षक तथा उपप्राचार्य पोलीस – प्रशिक्षण संस्था, खंडाळा, पुणे सेवा निवृत्त ) तसेच मा.प्रा. श्री. माधव आग्री सर (M.SC, B.ED, M.B.A, D.B.M) , Supervisor अभिनव कॉलेज भायंदर, आदर्श शिक्षक, राज्य तसेच राष्ट्रीय अँवार्ड, माजी अध्यक्ष – कुणबी समाजन्नोती संघ मुंबई, शा.ता.रोहा मुंबई लाभले होते. दोन्ही मार्गदर्शकांनी उत्कर्ष असे विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे डॉ. दुसार साहेबांनी विद्यार्थी शाळा व कॉलेज मध्ये कसा राहावा, कसा वागवा, अभ्यास कसा करावा, मोबाईलचा वापर किती करावा या बद्दल अगदी दिलखुलासपणे विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच मा.प्रा.श्री. आग्री सरांनी कोणत्या वर्षांपासून पुढील शिक्षण धोरण अमलात आणावे, १० वी नंतर कोणत्या शिक्षणाच्या वाटा आपल्याला उपलब्ध आहेत, आपल्या परिस्थितीनुसार आपण कोणते कोर्स करावे, ते कोर्स केल्यावर आपल्याला कोणते फायदे होतात, या बद्दल सुसज्ज असे मार्गदर्शन केले. त्या बद्दल प्रा. आग्री सरांचे खूप खूप आभार…!




















प्रमुख मार्गदर्शकांनी उपयुक्त असे मार्गदर्शन केल्यानंतर विभागातील १० गावातील १० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा म्हणून विभागाच्या वतीने प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. हे प्रशस्ती पत्र प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाखा ता. रोहा उपाध्यक्ष श्री लक्ष्मण फेपडे, खजिनदार श्री. दिलीप कदम, तसेच कांटीबोडण गाव अध्यक्ष श्री. यशवंत लोंढे, उचेल गाव अध्यक्ष श्री. मंगेश कदम, साठलेवाडी गाव अध्यक्ष श्री. गणेश आग्री, तसेच विभागीय संघटक, श्री दिनेश इंगळे, श्री संजय साठले, श्री सिताराम नाचरे, श्री किसन घाग, माजी सचिव श्री सुर्यकांत गावणकर, क्रिडा प्रमुख श्री संतोष दोडेकर, का.सदस्य श्री सुरेश पानगले, माजी सहसचिव श्री प्रसाद भुवड तसेच समाज बांधव श्री संजय रामाणे, श्री लक्ष्मण निकम, श्री सुरेश घडशी, श्री नितेश मोरे, श्री सुजित केंबळे, श्री प्रशांत आदावडे, श्री पांडुरंग मोडक इ. समाज बांधव उपस्थित होते आणि विशेष आभार सर्व उपस्थित विद्यार्थी वर्गाचे ज्यांच्यामुळे ह्या कार्यक्रमाला शोभा आली व मार्गदर्शन सोहळा व्यवस्थितरित्या पार पडला.
या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी गोपाळवट विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष हातभार लावत उपाध्यक्ष पांडुरंग दोडेकर, सचिव चेतन डिके, सहसचिव हरेश बोबले, सहसचिव विश्वनाथ भुवड, खजिनदार योगेश घडशी, सहखजिनदार विजय गोरीवले, प्रचारक सचिन रामाणे व मनोहर आगोंडे आणि संघटक यांनी गेली महिनाभर खूप मेहनत घेतली, त्या बद्दल सर्व कार्यकर्ते यांचे खूप खूप आभार…!
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागाचे उपाध्यक्ष पांडुरंग दोडेकर यांनी केले. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे आपल्या कँमेरामध्ये अचूक क्षण घेत सहसचिव हरेश बोबले यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि आम्ही कार्यकारिणी आशा करतो की विद्यार्थ्यांना ह्या मार्गदर्शन शिबीरामधून नक्कीच बोध मिळाला असावा, हीच अपेक्षा ! आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.अशी माहिती
कार्यकारिणी पदाधिकारी
प्रचार प्रसार टिम
गोपाळवट विभाग मुंबई यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com