“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” आर्थिक लाभ योजने अंतर्गत २१ ते ६५ वर्षांच्या महिलांना दरमहा १५०० रुपये बँक खात्यात जमा होणार…!

0
Spread the love

प्रतिनिधी. मंगेश उईके

पालघर :-महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मबावि-२०२४/प्र.क्र.९६/का-२दिनांक:-
२८/०६/२०२४ राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेचे स्वरुप :- पात्रता कालावधी दरमान्य प्रत्येक पात्र महिलेस तिच्या “स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) सक्षम बैंक खात्यात” दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र / राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये १५०० पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.

योजनेचे लाभाथर्थी :

  • महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत,
    परित्यक्त्या आणि निराधार महिला
    योजनेचे लाभाथों निश्चीत करणेसाठी १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात आले आहे.

तसेच ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक. ०१ जुलै, २०२४ पासुन दरमहा १५०० रुपये
आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

योजनेची पात्रता :-

१) महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीच
१) रेशनकार्ड
२) मतदार ओळखपत्र
३) शाळा सोडल्याचा दाखला
४) जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.

२) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांचे पतीचे
१) जन्म दाखला
२) शाळा सोडल्याचा दाखला
३) अधिवास प्रमाणपत्र ग्राहय
घरण्यात येईल.
३) विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला
४) वय २१ ते ६५ वर्षे
५) रु. २.५ लक्ष उत्पन्न दाखला नसेल तर ज्या कुटुंबाचे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना
उत्पन्नाच्या असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्राततून सुट देण्यात येत आहे. ) लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते आधारलिंक असणे आवश्यक आहे.

योजनेची अपात्रता :-

१) ज्या कुटुंबाचे वार्षिक एकत्रीत उत्पन्न २.५० लाख पेक्षा जास्त आहे.

२) कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे.

३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत नियमित / कायम / कंत्राटी कर्मचारी म्हणून केंद्र अथवा
राज्य सरकार मध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर

४) ज्यांच्याकडे ४ चाकी वाहन आहे (ट्रक्टर वगळूण)

५) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.

सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

१) नारीशक्ती दुत या अॅप्लीकेशन मध्ये योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज

२) आधारकार्ड

३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / जन्मदाखला

४) उत्पन्नाचा दाखला

५) बैंक खाते पासबुक

६) पासपोर्ट आकाराचा फोटो

७) रेशनकार्ड

८) योजनेच्या अर्टी व शर्ती पालनाचे हमीपत्र

९) लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे आधारलिंक असणे आवश्यक आहे. करीता “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळील अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका /
मुख्यसेविका / सेतु सुविधा केंद्र / ग्रामपंचायत / ग्रामसेवक / वार्ड अधिकारी यांचेकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन मा. जिल्हाधिकारी, पालघर व मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पालघर
मलीनाथ कांबळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,यांच्या वतीने करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट