जमिनीच्या वादातून सख्या चुलत्याने पुतण्यावर काठीने हल्ला केल्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

उपसंपादक -राकेश देशमुख
महाड :- महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकरे या गावी जमिनीच्या वादातून सख्या चुलत्याने पुतण्यावर काठीने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
याबाबत आरोपी गणपत रामचंद्र पवार वय 58 रा. कोकरे , सध्या राहणार घणसोली,मुंबई यांच्याविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दिनांक 23 जून रोजी साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी रोहित राजू पवार वय 28 व सख्खे चुलते गणपत रामचंद्र पवार हे दोघेजण आरोपी गणपत पवार यांच्या घरी बसले असता जमीन वाटपाचा विषय निघण्यास सुरुवात झाली.
यावरून फिर्यादी हे आरोपी यांस तुम्ही कुठल्या जमीन वाटपाचा विषय काढता असे म्हटल्यानंतर आरोपी गणपत पवार यांचा राग अनावर झाला आणि त्यातच त्यांनी आपल्या हातातील मेसाच्या काठीने पुतण्या रोहित पवार याला पाठीवर ,पायावर ,हातावर ,डोक्यावर, डोळ्याच्या भुवईवर बेदम मारहाण करायला सुरुवात केली, तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी चुलते गणपत रामचंद्र पवार यांच्याविरुद्ध भा.द.वि.स. कलम 324, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू पवार हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com