मनसे विभाग अध्यक्ष श्री. निलेश शिरधनकर याच्या सहकार्याने विभागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप…

संपादिका- दिप्ती भोगल
मुंबई :-महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार हिल विधानसभा सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे व मा. श्री. बाळा नांदगावकर साहेब , नेते यांच्या वाढदिवसानिमित्त विभाग अध्यक्ष निलेश शिरधनकर यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक २१७ चे शाखाध्यक्ष श्री. सुजय सावंत यांनी शनिवार दिनांक २२/६/२४ रोजी विद्यार्थी गुण गौरव व ५ ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सौ. सुप्रिया ताई दळवी, बंटीभाई म्हशिलकर लाभली व विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले सदर कार्यक्रमास कुलाबा विधानसभेचे विभाग अध्यक्ष श्री बबन महाडिक, मलबार हिल विधानसभेचे महिला, पुरुष विभाग अध्यक्षा, विभाग सचिव, उपविभाग अध्यक्ष, उपविभाग सचिव, शाखाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती
जितेंद्र गोंजी कार्यालय अध्यक्ष यानी दिली.









ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com