मुंबईत कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका संगमेश्व तर्फे सर्वसाधारण सभेचे आयोजन संपन्न

0
Spread the love

प्रतिनिधी-दिप्ती भोगल

मुंबई: कुणबी युवा संगमेश्वरची सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता कुणबी ज्ञाती ग्रह, वाघे हॉल, परेल येथे शाखा अध्यक्ष संजय गोंधळी यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली प्रथम महापुरुषांना विनम्र अभिवादन करून सभेला सुरवात करण्यात आली मुलुंड येथे उभं राहत असलेल्या विदयार्थी वसतिगृहसाठी निधी संकलन या विषयावर चर्चा करून समाजबांधवांकडून जिथे आपल्या समाजाचे भवितव्य घडणार आहे तिथे जास्तीत जास्त निघी उभा करून देण्याचे निश्चित करण्यात आले तसेच विषय पत्रिकेनुसार विविध विषयावर समाजाला पूरक आणि सर्वच क्षेत्रात आघाडी कशी व कोणत्या प्रकारे घेता येईल यावर उपस्तिथ समाजबांधवांनी मत मांडली आणि यानुसार पुढील काळात अशा प्रकारचे नियोजन केले जाईल असे सर्वानुमते निश्चित करण्यात आले

पदाधिकारी निवड ज्यांना समाजात आवड आणि बदल घडवायचे आहेत अशा युवकांना सभागृहात प्रक्रियेनुसार उभे राहण्यास सांगण्यात आले आणि जे कार्यरत आहेत आणि जे कार्यरत होऊ पाहात आहेत अशा युवकांना संधी देण्यात आली उपाध्यक्ष प्रदीप कृष्णा साप्ते गाव निवे खुर्द सहखजिनदार परेश दीपक शितप सहसेक्रेटरी प्रवीण आत्माराम ढवळ गाव तिवरे तर्फे देवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सभागृहाने तिन्ही युवकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचाळीस मनपूर्वक शुभेच्या दिल्या आणि जबाबदारीची जाणीव देखील करून देण्यात आली.

यावेळी शाखा तालुका अध्यक्ष संजय गोंधळी सेक्रेटरी शांताराम घागरे सहसेक्रेटरी प्रदीप धुमक सहसेक्रेटरी विष्णु खापरे दिलीप भेरे कार्यकारणी सदस्य प्रभाकर धनावडे कुणबी युवा प्रचारप्रमुख सचिन रामाणे युवा अध्यक्ष संदीप धुळप खजिनदार सुरज ओकटे उपाध्यक्ष संदीप गीते प्रमोद घेवडे प्रचारक शैलेश दळवी श्रीकांत भायजे सागर जयेंद्र घडशी प्रचारक प्रणय घडशी राजन फडकले अनंत नाचरे तसेच कुणबी युवा प्रचार प्रमुख मुंबईचे श्री. सचिन रामाणे ही उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.co

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट