पालघर मध्ये “बाल हक्क आयोग आपल्या दारी” संकल्पनेतून प्रलंबीत सुनावणी व आढावा बैठक संपन्न..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर :-दि. २३ (जिमाका) :महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पालघर बाल हक्क आयोग आपल्या दारी या संकल्पनेतून प्रलंबीत सुनावणी व आढावा बैठक संपन्न झाली , आयोगाच्या बैठकी मध्ये सकाळच्या सत्रात जिल्हातील प्रलंबीत प्रकणांचा आढावा घेण्यात आला,व उपस्थित नागरीक व शासकीय विभागांचे प्रश्न व समस्यांचे समाधान व आवश्यक त्या केसेस मध्ये सुचना व अहवाल आयोगास सादर करण्याबाबत सुचना देण्यात आल्या .
दुपारच्या सत्रात जिल्हातील वेगवगळ्या विभागांचा आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, मलिनाथ कांबळे हे उपस्थित होते, तसेच आयोजक म्हणूनही त्यांनी मा आयोगाच्या सुचनेप्रमाणे नियोजन केले, सदर आढावा बैठकीस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत सदस्य, चैतन्य पुरंदरे, निलीमा चव्हाण, माधवी भोसले, शिक्षण अधिकारी, प्रमोद बाडगी, विधी सल्लागार, उज्वला होवाळ, परिवीक्षा अधिकारी, अजय लोंढे, कनिष्ठ काळजी वाहक व कामगार विभाग, पोलीस विभाग, विशेष बाल पोलीस युनिटचे अधिकारी, शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिक, महिला व बाल विकास ICDS विभाग, आदिवासी प्रकल्प विभाग जव्हारचे प्रतिनीधी, समाज कल्याण विभाग, जि.प., पोलीस अधिक्षक कार्यालय प्रतिनिधी, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राजकन्या आडोळे व सदस्य, माजी बाल कल्याण समिती, अध्यक्ष, विधायक भारती,सामाजिक संस्था मुंबईचे संतोष शिंदे त्यांचे सहकारी, वसुधरा लाईफ फॉउडेशस संस्थाचे माजी अध्यक्ष बाल कल्याण समिती, शारदा शिंदे, जिल्हातील बालगृहे करुणा वेलफेअर, गीरीवनवासी बालगृह, रेस्क्यु फांउडेशन बालगृह, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कर्मचारी, चाईल्ड लाईन युनिट कर्मचारी, हे उपस्थित होते,
सर्व उपस्थित विभागांचे आयोगाच्या सदस्यांनी कामकाज आढावा, जिल्हातील कार्यवाही, अडचणी, नवीन उपक्रम, बाबत माहिती विचारणा करुन प्रत्येक विभागात केलेल्या कामाचे अहवाल आयोगास सादर करावे व आवश्यक असल्यास प्रशिक्षण काय्रक्रम आयोगामार्फत घेण्यात येईल असे उपस्थित पोलीस विभाग, शिक्षण विभाग, कामगार विभाग, व इतर विभाग यांना देखील सुचना केल्या. तसेच ICDS विभागास बालकांना पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहार व किट बाबत विचारणा करुन माहिती घेतली. तसेच पालघर जिल्हाची प्रशासकीय ईमारत व शासकीय कार्यालय बाबत देखील आयोगाच्या सदस्यांकडुन कौतुक करण्यात आले व सर्व उपस्थित विभागांना आपापल्या विभागासंबधीत योजना, कायदे, यांचे जनजागृती, प्रसार प्रसिध्दी करण्यात यावे अशा प्रकारच्या सुचना दिल्या, या प्रमाणे सकाळी १०.३० ते सायकांळी ५.०० वाजेपर्यत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, दौरा पालघर बाल हक्क आयोग आपल्या दारी या संकल्पनेतून प्रलंबीत एकुण २२ प्रकरणांची सुनावणी यावेळी आयोगामार्फत घेण्यात आली व आढावा बैठक पार पडली, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मलिनाथ कांबळे यांनी दिली.





ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com