निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या अधिकारावर कारवाई करा पंचाली रमाईनगर ग्रामस्थांची मागणी..

0
Screenshot 2024-06-22 141830
Spread the love

प्रतिनिधी. मंगेश उईके

पालघर बोईसर :– रेल्वे फाटक नं. ५० येथील निकृष्ट दर्जाचे अंडर ग्राऊंड ब्रीज आणि त्या मधील साचलेल्या पाण्याच्या समस्याबाबत पंचाळी रमाईनगर ग्रामस्थांच्या वतीने मुंबई सेंट्रल डिव्हिजनल रेल्वे मुख्यालयात पत्र देण्यात आले. ओव्हर ब्रिजची मागणी करण्यात केली.

पालघर तालुक्यातील पंचाळी ग्रामपंचायती मधील रमाईनगर हे गाव रेल्वे फाटक नं. ५० च्या पलीकडे वसलेले आहे. गावातील ग्रामस्थाकरिता रेल्वे फाटक मधून येण्याजाण्यासाठी पूर्वापार रस्ता होता. रेल्वे च्या लाईन (पट्री) वाढविल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात आले आणि ग्रामस्थांना येण्या जाण्या करिता अंडर गाऊंड ब्रिज बनवून दिलेले आहे. अंडर ग्राऊंड ब्रीज मधील रस्ता हाच गावाचा एकमेव मार्ग आहे. इतर पर्यायी रस्ता नाही. परंतु अंडर ग्राऊंड ब्रीज हे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले आहे . पाण्यासाठी कोणतेही योग्य नियोजन नाही व कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. यामुळे गावातील ग्रामस्थांना येण्याजाण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागते.

विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, कामगार, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांच्यासाठी सदर ब्रीज हे धोकादायक झाले आहे. अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्याना पत्र व्यवहार आणि तोंडी समस्याबाबत चर्चा केली असता अधिकारी हे उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. याकरिता ग्रामस्थ हे अंडर ग्राउंड ब्रिज च्या समस्यासाठी खूपच त्रस्त आहेत. शासन दरबारी आपल्या समस्येची आणि तक्रारीची दखल घेण्याकरिता रेल्वे फाटक नं. ५० येथील निकृष्ट दर्जाचे अंडर ग्राऊंड ब्रीज आणि त्या मधील साचलेल्या पाण्याच्या समस्याबाबत पंचाळी रमाईनगर ग्रामस्थांच्या वतीने मुंबई सेंटर डिव्हिजनल रेल्वे मुख्यालयात निवेदन देण्यात आलं. निकृष्ट दर्जाचा काम करणाऱ्या अधिकारावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी पंचाली रमाई नगर चे ग्रामस्थ करत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट