रायगडावर आज तिथीनुसार 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक -राकेश देशमुख

महाड :-शासकीय यंत्रणा रायगडावर सज्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शिवराज्यभिषेक

गडावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात

आज रायगडावर 351 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत असून सकाळी 8 वाजता ध्वजारोहण त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, गडावर मोठया स्वरूपात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ,पावसाची रिमझीम एकीकडे सूरु असुन तेवढ्याच उत्साहात शिवभक्त मात्र गडावर दाखल होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता गडावर दाखल झालेत त्यांच्या हस्ते आज शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडत आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, यांची देखील रायगडावर उपस्थिती राहिली आहे. आज रायगडावर पावसाच देखील मोठ्या जल्लोषात आगमन झालेला आहे असंख्य शिवभक्त गडावर दाखल झाले. आजचा शिवराज्याभिषेक सोहळा पहा फक्त सुरक्षा पोलीस टाईम्स न्यूज चॅनेल वर…

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट